वारळ ग्रामपंचायतीत काँग्रेसची शिवसेनेसोबत आघाडी...

वारळ ग्रामपंचायतीत काँग्रेसची शिवसेनेसोबत आघाडी...
वारळ, प्रतिनिधी
 आगामी विधानसभा - लोकसभा निवडणुकीच्या आघाडी संदर्भात काँग्रेस - राष्ट्रवादी अनुकूल होत आहेत . अंतिम निर्णय दिल्लीत व्हावा अशा भूमिकेपर्यंत आघाडीबाबत विषय सुरु असला तरी , राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात म्हसळा तालुक्यातील वारळ ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक काँग्रेसच्या मंडळींनी आम्ही शिवसेनेसोबतच राहणार असल्याची स्पष्ट भूमिका घेतली . शिवसेना - काँग्रेस युतीतच्या १० उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले . उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शिवसेना तालुका प्रमुख नंदू शिर्के , काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष डॉ . मुईज शेख , माजी सभापती महादेव पाटील , क्षेत्रीय संघटक रविंद्र लाड काँग्रेस आयचे माजी तालुका अध्यक्ष महादेव भिकू पाटील , रहीमतुल्ला मुकादम , अकमल कादरी , रफीक काजी , शकील साटवीलकर , भाई कांबळे , नथुराम खोत , निलेश भायदे , जगन्नाथ धुमाळ , अनंत नाक्ती आदी उपस्थित होते यावेळी शिवसेना - काँग्रेस ( आय ) युतीच्यावतीने सरपंच पदासाठी रमेश नथुराम खोत , सदस्य पदासाठी नथुराम पांडुरंग पाटील रंजना महादेव म्हात्रे , निर्मल वसंत बिराडी , तब्बसुम अकलाख काजी , कल्पेश किसन बिराडी , मालती गणेश सायगांवकर , मालती किसन बिराडी , रुपेश रामकृष्ण श्रीवर्धनकर , समीर शमसुद्दीन बेडेकर , वनिता रमेश वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा