म्हसळा : सुशील यादव
रायगड जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या माध्यमातुन जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या मौजे गणेशनगर येथे अंगणवाडी इमारत व अंतर्गत रस्त्याचे उदघाटन भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक व नुकतेच भाजप मध्ये प्रवेश केलेले रेवली ग्रुप ग्रामपंचायतचे नवनिर्वाचीत सरपंच अनंत कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर कार्यक्रम प्रसंगी पंचक्रोशीतील ग्रामस्थ सामील झाले होते.यावेळी कृष्णा कोबनाक यांनी विविध योजनांची माहिती दिली तसेच पुढील काही कामे असल्यास लवकरात लवकर सुचवण्यात यावी असे गणेशनगरचे गाव अध्यक्ष गोविंद कांबळे यांना सांगितले. यावेळी श्रीवर्धन विधानसभा विस्तारक पंकज शहा , जिल्हा चिटणीस सरोज म्हशीलकर , जिल्हा कार्यकारिणी सदस्य मंगेश म्हशीलकर , तालुका अध्यक्ष शैलेश पटेल , तालुका सरचिटणीस, तुकाराम पाटील, प्रकाश रायकर, जिल्हा युवा मोर्चा चिटणिस महेश पाटील , शहर अध्यक्ष मंगेश मुंडे ,मीना टिंगरे , माजी पंचायत समिती सदस्या प्रियांका शिंदे , सुनिल शिंदे , मेंदडी गण अध्यक्ष अनिल टिंगरे, अल्पसंख्याक मोर्चा तालुका अध्यक्ष समीर धनसे ,मनोहर जाधव, जलील तालिब ,शरद कांबळे यांच्या सहीत भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment