म्हसळा तालुका बौध्दजन समिती आणि बौध्दजन पंचायत समिती यांच्या विद्यमाने एस. एस. सी. व्याख्यानमाला संपन्न.


विनायक जाधव,

म्हसळा तालुका बौध्दजन समिती (मुंबई) आणि बौध्दजन पंचायत समिती शाखा, म्हसळे यांच्या विद्यमाने दिनांक २१/१/२०१८ रोजी नामांकीत न्यु इंग्लिश स्कुल म्हसळे या ठिकाणी, एक दिवसीय एस. एस. सी. व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात होते.

महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि दिप प्रज्वलीत करून मुंबई समितीचे अध्यक्ष आयु. मुकूंद पवार यांच्या हस्ते व्याख्यानमालेचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबईमधील नामांकीत सरस्वती क्लासेसचे श्री. केसरकर सर आणि श्री. शिंदे सर यांनी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सलग सहा तास विद्यार्थ्याना बहुमोल मार्गदर्शन केले.
माघ महिन्यातील गणेश जयंती उत्सव या दिवशी असल्या कारणाने तालुक्यातील सुमारे एकशे सत्तर विद्यार्थ्यानी या शिबिराचा फायदा घेतला. यामुळे आयोजकांनी समाधान व्यक्त केले.
सन २०१७ मध्ये जाहीर झालेल्या शासकीय अहवालानुसार म्हसळे तालुका शैक्षणिक क्षेत्रात एक नंबरवर आहे याचे श्रेय शिक्षक, शैक्षणिक संस्थांबरोबर बौध्दजन समितीला देखील जाते असे पालक वर्ग खाजगीत सांगतात.

सदर प्रसंगी शिवसेना माजी तालुका प्रमुख श्री समीर बनकर, समितीचे ज्येष्ठ नेते हरीचंद्र मोहीते, न्यु इंग्लिश स्कुलचे प्राचार्य श्री. माळी सर, बौध्दजन पंचायत तालुका म्हसळा शाखेचे अध्यक्ष अनंत येलवे गुरूजी, समन्वय समितीचे अध्यक्ष अनंतराव येलवे आदि मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयु. सुभाष जाधव आणि आयु. संतोष चापडेकर यांनी केले तर उपस्थितांचे पुष्प गुच्छ देऊन आयु. संदिप गोपाळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले
प्रसंगी न्यु इंग्लिश स्कुलचे तमाम प्राचार्य आणि कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर. पी. आयचे तालुकाध्यक्ष राजेश तांबे, समितीचे पदाधिकारी  संदिप गोपाळे , सुभाष जाधव ,धनश्याम जाधव, संतोष चापडेकर, विनोद येलवे, मंगेश तांबे, अंकुश तांबे  यांनी विशेष परीश्रम घेतले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा