श्रीवर्धन मधील दुर्गसंवर्धन मोहीम फत्ते : श्रीवर्धन मधील शिवप्रेमींनी वेधले किल्ल्याकडेे लक्ष , मावळा संघटनेने केले मदगडवर श्रमदान व स्वच्छता..

श्रीवर्धन मधील दुर्गसंवर्धन मोहीम फत्ते : श्रीवर्धन मधील शिवप्रेमींनी वेधले किल्ल्याकडेे लक्ष , मावळा संघटनेने केले मदगडवर श्रमदान व स्वच्छता..

दिघी: गणेश प्रभाळे

पुरातत्व विभागा कडून आजतागायत दुर्लक्षित व् प्रशासनाच्या उदासिनतेचे उदाहरण म्हणजे श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे येथिल ऐतिहासिक वनदुर्ग मडगड किल्ल्याची उपेक्षा कशी झाली हे या ठिकाणी गेल्यावर कळते . मात्र , श्रीवर्धन तालुक्यातील मावळ संघटनेतर्फ रविवारी दिनांक २१ जानेवारी रोजी श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे येथे असलेल्या मदगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली . गड - किल्ल्यांची अवस्था सध्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे गड किल्ले वाचवण्यासाठी मावळ संघटनेतर्फ दुर्गसंवर्धनाची मोहीम हातात घेण्यात आली आहे संस्थापक जयेश राहटवळ यांच्या नेतृत्वा खाली योगेश निवाते , समीर हरपाळ गजू भाटकर , वैभव कदम , धनंजय म्हापोळकर , अक्षय दिवेकर , कान्हा पडवेकर , देवेंद्र मुकादम , परेश पयेर , सुजित शिस्तकार , मुकेश दिवेकर , गौरव तोंडलेकर , सोहम तोडणकर , रुचिर गाणेकर , रुपेश दिवेकर , विजय कांबळे , संजय शिरवटकर , व अनिकेत कदम या सहकार्यांनकडून ही मोहीम राबविण्यात आली . चौदाव्या शतकातील मदगड हा एकमेव किल्ला श्रीवर्धन तालुक्यात येतो . दिवेआगरहून बोर्लीच्या मागच्या मदगडच्या डोंगरावरून वांजळे मार्ग म्हसळयाकडे रस्ता जातो . त्याच्या अलीकडे उजवीकडे फुटणारी दर्शनासाठी पायवाट मदगडकडे नेते . आता इथे फारसे काही शिल्लक नसले तरी सभोवतालचा मोठा परिसर नजराणा इथून दिसतो . 

                          संशोधनाची गरज  
मदगडच्या पायथ्याशी वांजळे गाव आहे वांजळे गाव पर्यंत पक्का गाडी रस्ता आहे हा संपूर्ण प्रदेश डोंगरदर्यांनी व्याप्त असल्याने प्रवास आनंदमय होतो . गावातून वाटाड्या घेणे आवश्यक आहे . जंगली प्राण्यांच्या भीती मुळे दुर्गमित्रांनी खबरदारी घेणे महत्वाचे आहे गडावरील दाट झाडी व हिंस्र प्राण्याचे भय यांमुळे अवशेषांची शोधयात्रा करणे कमालीचे कठीण आहे . मदगडावर फारसे दुर्गमित्र जात नसल्याने गडा विषयी व अवशेषांविषयी अभ्यासनीय माहिती उपलब्ध नाही . 


                       इतिहास काय सांगतो...
हा किला छत्रपतींच्या अमलाखाली असल्याची शक्यता बोलण्यात येते . संभाजी राज्यांच्या मृत्यू नंतर गड सिद्दीच्या ताब्यात गेला . पण मराठ्यांनी जून १७३३ मध्ये मदगड परत स्वराज्यात आणला . बोर्ली वांजळे मार्गावर ८ किमी अंतरावर मदगड आहे . सन १७३५ च्या पत्राप्रमाणे मराठे व सिद्धी यांच्या मधील लढाईच्या प्रसंगात मदगडची संरक्षण व्यवस्था पेशव्यांनी वाढवली होती , आता गडावर घनदाट झाडी झुडपे वाढली आहेत . हि सगळी वनऔषधी आहेत . झाडा झुडप्यांमुळे गडावरील अवशेष दिसून येत नाही . पाण्याची टाकी , घरांची जोथी व त्यांची चिरे आढळतात . मदगड वरून श्रीवर्धन , दिघी, दिवेआगर , हिम्मतगड हे पाहू शकतो . हा किल्ला १७ व्या शतकात सिीच्या ताब्यात असताना श्रीमंत रमाबाई पेशवे इ . स . १७७२ मध्ये देव दर्शनासाठी आल्या असताना मदगड वरून तोफांची सलामी दिली गेली . तसेच हत्तीवरून नजराणा पाठविला होता . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा