बोर्ली पंचतन : अभय पाटील
दिघी पोर्ट येथील सुरक्षा रक्षक व इतर कामगार यांना आपण व्यवस्थापनाकडून जर कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष होत असल्यास संघटना कामगारांच्या पाठीशी निश्चित पणे उभी असेल असे आश्वासन कामगार युनियन अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी दिले , नुकतीच काशिद बीच येथे प्रकृती रिसॉर्ट येथे भारतीय कामगार सेना दिघी युनिट याची युनियन अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्या समवेत कामगारांच्या वेतन वाढीच्या करारा संदर्भात सभा घेण्यात आली आली त्यावेळी ते बोलत होते . कामगाराना योग्य वेतनवाढ करून देण्याची जबाबदारी
महाडिक यांनी घेतली असून वेळ प्रसंगी कामगारांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेऊन योग्य न्याय मिळवून देऊच असे महाडिक यांनी उपस्थित कामगारांना आश्वासित केले . गेल्या एक वर्षापासून कामगारांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावल्या जातील व एक वर्षाचा पूर्ण थकीत असणारे भत्ते तसेच वैद्यकीय सुविधा , बोनस , भविष्य निर्वाह निधी उपलब्ध करून देण्यात येईल . सदर सभेस दिघी युनिट अध्यक्ष श्री संतोष नागावकर , उदयजी शेळ्ये , श्री भोसले , दिबी युनिट उपाध्यक्ष वैभव नागवेकर , सल्लागार दिनेश नाक्ती , रत्नदीप कावळे , मनोहर पाटील , बाळकृष्ण गुणाजी उपस्थित होते .

Post a Comment