म्हसळा तालुक्याचा विकास राष्ट्रवादीनेच केला जि .प . अध्यक्षा आदिती तटकरे यांचे प्रतिपादन...


म्हसळा,
केंद्रात आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस दत्तेत नसतानाही म्हसळा तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भरघोस निधी आणण्यात यशस्वी ठरला आहे . यामुळे म्हसळा तालुक्याच्या विकास राष्ट्रवादी काँग्रेमुळेच होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांनी केले . रोहिणी आणि काळसुरी येथे सामाजक सभागृह व सभामंडपाचे भूमीपूजन आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले . रायगड जिल्हात जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉग्रेिस आणि शैकाप आघाडीची सत्ता आहे या माध्यमातून जिल्ह्यातील तालुक्यांत वाडीवस्तीवर वेगवेगळ्या योजनांमधून सर्वांगीण विकासासाठी आम प्राधान्य दिले आहे . श्रीवर्धन मतदारसंघातील म्हसळा तालुक्यात ख-या अथनेि मागील अनेक वर्षांपासून आमदार अनिल तटकरे यांच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहत आहे . याचेच प्रत्यय एका आठवड्यातच तुरुंबाडी , मेंदडी , काळसुरी , रोहिणी या गावातील मंजुर सामाजीक विकास कामांचे उद्घाटन करताना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी त्यांचे समवेत तालुका अध्यक्ष नामभाई हसवारे , सभापती उज्वला सावंत , जिल्हा परिषद सदस्य बन सन , पंचायत समिती सदस्य संदीप चाचले , सदस्या  छाया म्हात्रे, श्रीवर्धन मतदार संघ युवक अध्यक्ष संतोष पाखड लहूशेठ म्हात्रे , हरभाई काशी आदि मान्यवर पदाधिकारी , पश्व कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा