घोणसे ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधलेधले पाच वनराई बंधारे...


म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा घोणसेमधील तालुक्यातील ग्रामस्थांच्या श्रमदानातून ग्रामपंचायतीच्या साह्याने गावानजीक व गावा शिवारातील पानतळ भागात नदी , नाळे देऊळ , रहाट गोठण , चिटकोबाचा मंदिरमार्गे जाणारा पाण्याचा प्रवाह अडवून १५ ते ३० मीटरचे ५ वनराई बंधारे बांधण्यात आले हे बंधारे बांधल्यामुळे पावसाचे पाणी भूगर्भात झिरणार आहे या बंधाच्यात पाणी वन्यप्राणी , साठलेले पाळीव प्राणी यांना पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे त्याच भागात नारळ , सुपारी , पालेभाज्या बागायतदार , कलिंगड पावटा व अन्य झाडांची बागायत आहे त्या बागायतीसाठी या वनराई बंधाच्याचा चांगलाच फायदा होणार आहे . तसेच शासनाची पाणी आडवा पाणी जिरवा प्रकल्प ह्या मार्गातून पूर्ण होणार आहे घोणसे गावामधील म्हशाचीवाडी , कानसेवाडी , विचारेवाडी , वडाचीवादी केलेवाडी आणि निवाचीवाडी येथील ग्रामस्थ नि स्वार्थ पणाने हे काम गेले अनेक वर्षे करीत आहेत . त्यामुळे पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हे वनराई बंधारे उपयुक्त ठरणार आहेत . पाणी साठविण्यासाठी कमी खर्चात व कमी वेळेत बंधारे बांधल्याने ग्रामस्थांचा व शासनाचा आर्थिक भार यामळे कमी झाला आहे अशा प्रकारे वनराई बंधारे घोणसे येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून आहे . घोणसे गावातील सर्व ग्रामस्थ व महिला मंडळ शासनाच्या वेळोवळी मदत करतात शासनाने सुचवलेले काम निःस्वार्थपणाने आजवर केले आहे त्यामुळे आमच्या ग्रामपंचायतीकडून विशेष आभार मानत असल्याचे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका निलमा सतार यांनी सांगितले 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा