राज्य सरकारच्या विविध योजनामंधून म्हसळा येथील कामांवरुन भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपल्याचे चित्र आहे श्रीवर्धन मतदारसंघात भाजपचा विकासकामांचा धडाका पाहून सिंचन घोटाळा करणारे भूमिपूजने करत फिरत असल्याची बोचरी टीका रायगड जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी केली आहे . नेवरूळ ते सांगवड रस्त्याच्या भूमीपूजनानंतर सेना - भाजपची संयुक्त पत्रकार शासकीय , परिषद विश्रामगृह म्हसळा येथे घेण्यात आली . यावेळी भाजपच्या जिल्हा चिटणीस सरोज म्हशीलकर , मंगेश म्हशीलकर , मंगेश मुंडे , प्रकाश रायकर , सनेचे तालुकाप्रमुख नंदू शिर्के , महादेव पाटील राजाराम तिलटकर , तुकाराम पाटील , अनिकेत पानसरे , अनिल महामुणकर , अमित महामुणकर , जितेंद्र नटे , गणेश बोलें , कृष्णा म्हात्रे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यांच्यासहित उपस्थित होते . कृष्णा यावेळी कोबनाक व सेनेच्या नेत्यांनी पाठपुरावा करत मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी अशासकीय भूमीपूजने करीत आहेत , असा आरोप केला विकासकामांचे भूमीपूजने व उद्धाटने सेना - भाजप एकत्र करतील असे यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नंदू शिर्के यांनी सांगितले . दरम्यान , याच कामाच्या भूमिपूजनाला सुनील तटकरे , जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे हजर राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे सतीश शिगवण यांनी सांगितले .
म्हसळा : विकासकामांवरून राष्ट्रवादी , भाजपचा श्रेय वाद ...
Admin Team
0

Post a Comment