सामाजीक सभागृहात ग्रामस्थांनी वैचारीक बैठकी मधुन सामाजीक एकता आणि अखंडता ठेवत गावाचा विकास साधावा-सुनिल तटकरे
( म्हसळा- निकेश कोकचा )
लोकप्रतिनिधी म्हणुन गाववाडी वस्तीवर शासनाचे निधीतुन बांधुन दिलेल्या सामाजीक सभागृहात ग्रामस्थांनी वैचारीक बैठका घेत सामाजीक एकता,अखंडता ठेवत गावाचा विकास साधावा असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा तालुक्यातील तुरुंबाडी येथे श्री गणेश मंदिरा समोरील 5 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या भव्यदिव्य सामाजीक सभागृहाचे उदघाटन कार्यक्रमात व्यक्त केले.तुरुंबाडी हे गाव मोठया लोकवस्तीचे कष्टकरी कोळी बांधवांचे आहे येथील ग्रामस्थांनी कायमच आध्यात्मिक,सांस्कृतीक,कला,क्रीडाचा वारसा जोपासला असल्याने नवीन सभागृहात भजन किर्तनाचे माध्यमातून प्रबोधन करून गावाचा अधिकाधिक विकास साधावा अशा शुभेच्छा आमदार सुनिल तटकरे यांनी संक्रातीच्या शुभ मुहूर्तावर तुरुंबाडी ग्रामस्थांना दिल्या.या वेळी कार्यक्रमाला त्यांचे समवेत तालुका नेते अलिशेट कौचाली,तालुका अध्यक्ष नाझीमभाई हसवारे,जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे,सभापती उज्वला सावंत, उपसभपती मधुकर गायकर,पं.स.सदस्य संदीप चाचले,पं.स.सदस्य छाया म्हात्रे, पक्षाच्या माजी प्रतोद वैशाली सावंत,महिला अध्यक्षा रेश्मा काणसे,जेष्ठ नेते व्यंकटेश सावंत,युवक अध्यक्ष संतोष पाखड,लहुजी म्हात्रे आदि मान्यवर कार्यकर्ते व ग्रामस्थ महिला मंडळ मोठया संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार तटकरे यांनी महाराष्ट्रातील सेना भाजपचे सरकारच्या कारभारावर सडकून टिका करतानाहे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकरी,मच्छिमार यांच्या वर आलेला दुष्काळी प्रसंग,शेती पिकाला हमी न देणे,रस्तेविकास,उधोगधंदे वाढ,रोजगार उपलब्धता,महागाई कमी करणे,जबादारी घेतलेल्या मंत्री महोदयांचे बेताल वक्तव्य, आदी लोकपयोगी कामे करण्यास आणि प्रश्न सोडविण्याकामी पुरते भाजपसेना सरकार अपयशी ठरले आहे.सरकारमध्ये काम करीत असलेले सेना भाजपचे मंत्री व नेते एकमेकांवर टिकाटिपण्णी करीत नक्की सत्ताधारी आणि विरोधक कोण हेच जनतेला समजत नाही.विकास काय असतो आणि तो कसा करायचा हेच यांना आजुन कळले नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभर हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे.
हल्लाबोलाच्या पहिल्या टप्प्यात सरकारला नामोहरम करण्यात आम्हाला काही प्रमाणात यश आल्याने शेतकऱ्यांच्या हिताची कामे करून घेतली आहेत परंतु या सरकारला जागे करण्यासाठी हल्लाबोल करण्याचा दुसरा टप्प्यात मराठवाडा मधील 8 जिल्ह्यातील विदर्भ,उस्मानाबाद,बीड,नांदेड येथुन येत्या 20 ते 28 जानेवारी रोजी दररोज तीन जाहीर सभा घेऊन रस्त्यावर उतरून राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे आणि महाराष्ट्रातील हे खोटारडे सरकार बदलुन परिवर्तन करायचे असल्याचे आमदार सुनिल तटकरे यांनी जाहीर करताना राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेला संकल्प सिध्दीस जावा आणि आमच्या उक्तीप्रमाणे कृती व्हावी अशी प्रार्थना तुरुंबाडी येथील जनतेच्या साक्षीने श्रीगणेशाकडे केली.विधिमंडळातील दोन्ही सभागृहात आमचे पक्षाचे लोकप्रतिनिधींनी रस्ते विकासासाठी जमीन भुसंपादन आदी अडचणी बाबत लक्षवेधी लावुन धरल्याने जिल्ह्यातील अनेक गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना न मिळणारी नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाला भाग पडल्याचे नावे देऊन माहिती देताना सांगितले.म्हसळा तालुक्यातील रस्ते विकास कामांसाठी मी प्रयत्न केल्याने बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे कडुन 35 करोड रुपये निधी मंजुर करून घेतले आहे.विकास कामे करण्यासाठी मन आणि डोके शाबुत असावे लागते ते भान आम्हाला आहे त्यामुळे तालुक्यातील मंजुर कामांची भुमिपूजन,उदघाटन करण्याचा अधिकार आमचाच असल्याचे सांगताना सरकार कोणा एका पक्षाचा असला तरी विकास निधी हा जनता भरीत असलेल्या कररूपी निधींतून होत असतो त्यामुळे त्याचेवर सर्वांचाच अधिकार आहे.आम्ही जनतेने निवडुन दिलेले लोकप्रतिनिधी आहोत उदघाटन, भुमिपुजन करणे हा आमचा अधिकारच आहे हे माहीत नसलेल्या टीकाकारांनी आधी लक्षात घ्यावे असा टोला म्हसळा तालुक्यातील तथाकथित सेनाभाजप पदाधिकारी यांना केला.श्रीवर्धन मतदार संघात जनतेने मला आमदार केले म्हणूनच येथे गाववाडीत विज,पाणी,रस्ते, सामाजीक सभागृह, शिक्षण,आरोग्य,पर्यटन विकास करण्यासाठी चालना मिळाली असे ठणकावून सांगितले.तुरुंबाडी ग्रामस्थांनी सामाजीक सभागृहाचे उदघाटन करण्यास आलेल्या आमदार सुनिल तटकरे हे आमचे विकासमंत्री आहेत त्यांचे स्वागतही मंत्र्यांचे तोऱ्यातच करण्यात आला.कार्यक्रमात तुरुंबाडी गावचा पाणी प्रश्न लवकरच सोडविला जाईल याची खात्री दिली. आमदार सुनिल तटकरे तुरुंबाडी गाव दौऱ्यावर जात असताना त्या मार्गातील वारळ,काळसुरी ग्रामस्थांनी रस्त्यावर स्वागताला उभेराहून तिळगुळ देऊन नेत्यावरील असलेल्या प्रेमाचे अतुट नाते पहायला मिळाले.

Post a Comment