आधुनिक विज्ञानातून घेतला सहा हजार विद्यार्थ्यांनी अनुभाव :वरळी मध्ये देशभरातून असंख्य अगस्त्य कर्मचारींनी दर्शवला आपला सहभाग
( म्हसळा : निकेश कोकचा )
संपूर्ण भारत देशात सामाजिक सेवेमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये विज्ञान सेवेत सक्रिय असलेल्या अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन हि संस्था आज संपूर्ण देशामध्ये विविध प्रकारचे विज्ञान उपक्रम राबविताना पाहायला मिळत आहे, रायगड जिल्ह्यात सुद्धा म्हसळा श्रीवर्धन,तळा, माणगाव,महाड पोलादपूर या तालुक्यात सुद्धा फिरती प्रयोग शाळा घेऊन प्रत्येक खेडेगावात आज अगस्त्य फाऊंडेशन ची फिरती प्रयोगशाळा नवनवीन उपक्रम राबविताना दिसते . याच अगस्त्य इंटरनॅशनल फाऊंडेशच्या वतीने वरळी येथे नुकताच भव्य दिव्य अशा सायन्स अनुभव कार्यक्रमाचे पार पडला. या विज्ञान प्रयोग आयोजनावेळी मुंबई बृहन्मुंबई महानगर पालिकेतील सुमारे सहा हजार शाळेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमातील असंख्य वैज्ञानिक उपक्रमांची पाहणी केली. या उपक्रमांतर्गत मांडलेल्या विज्ञान मॉडेलची माहिती देण्यासाठी काही तरुण माहितीकार प्रमुख विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये शंभर ते दोनशे विद्यार्थ्यांनी या सहा हजार विद्यार्थ्यांना ठेवण्यात आलेल्या मॉडेलची माहिती दिली .या मॉडेलमध्ये लॅब इन बॉक्स कॉर्नर,पी बी एल कॉर्नर, जिज्ञासा कॉर्नर,एम एस एल कॉर्नर, आणि इतर बऱ्याच प्रकारचे अगस्त्य प्रोजेक्ट याठिकानी सादर करण्यात आले होते.
यावेळी अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन चे फाउंडर रामजी राघवन,महाराष्ट्र राज्याच्या अगस्त्य हेड सुनीता चोंढे,अगस्त्य आयएमटी टीम, इन्सट्रक्टर टीम,प्रोजेक्ट ऑफिसर टीम ,आणि इतर राज्याचे प्रोजेक्ट ऑफिसर यावेळी आवर्जून उपस्थित होते.

Post a Comment