माणगाव : कमलाकर होवाळ
संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा फटकाआता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. कॉरिडॉरचे रायगड जिल्हयात जाळे पसरले असून या कॉरिडॉरमुळे इथला शेतकरी व नागरिक पुरता उध्वस्त होऊ लागला आहे. कॉरिडॉर अंतर्गत दिघी पोर्ट ते पुणे बंगलोर महामार्गाच्या रस्ता रूंदीकरणाचे काम झपाट्याने सुरू आहे. या रस्त्यावर अनेक शेतकर्यांची शेती हि कुटुंबाची उपजिविकेचे साधन आहेत्याचबरोबर या रस्त्यालगत अनेकांची घरे उभी आहेत. पिढ्यानपिढया सांभाळलेली शेती आणि बांधलेल्या घरावर या चोपदरकरणामुळे दिवसा ढवळया बुलडोजर फिरणार आहेत्यामुळे अनेक कुटुंबाचे संसार रस्त्यावर येणार आहेत. तर काही नागरिकांची कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत असून या शेतकरी नागरिकांना कसलीही शासनाकडून नोटीस न येता व त्या बाधितांना नुकसान भरपाई न देता हे काम जोरात सुरू आहेत्यामुळे नागरिकांत असंतोष खदखदत असून या रस्त्याला विरोध नसला तरी बाधितांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मोर्चा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनातून दिली आहेत्याचबरोबर माणगाव प्रांत श्री. तिडके यांना या संघर्ष समितीने प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहेशेतकरी बाधितांना नुकसान भरपाई न मिळाल्यास संघर्ष समिती तीव्र आंदोलन छेडेल असा सणसणीत इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू मोरे, उपाध्यक्ष शैलेश यादव, सचिव संताजी पवार, खजिनदार अमोल मोहिते, संतोष मालुसरे, रणजित मोहिते यांनी दिला आहे.
याबाबत राष्ट्रवादी कॉ. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे यांनाही प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहेकॉरिडॉर अंतर्गत दिघी पुणे राष्ट्रीय महामार्ग संदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून या महामार्ग रूदकरणात शेतजमिन व राहती घरे तसेच गाई गुरांचे गोठे आणि अनेक व्यवसायिक दुकाने पिढ्यानपिढया चालत आलेली आहेत. या महामार्ग रुंदीकरणास प्रकल्पग्रस्तांचा विरोध नाही. मात्र या संदीकरणात मोर्चा, सुरले, बोलें आणि नाईटणे हि चार गावातील शेतकन्यांच्या जमिनी तसेच घरे प्रामुख्याने जात आहेत. त्यामुळे शेकडो घरे बेघर होणार आहेत. तर अनेक शेतकर्यांच्या शेतीही यात जात आहे. त्यामुळे ज्या शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे ती कुटुंबांचा संसार रस्त्यावर आला आहे. या बाधितांना शासनाकडून कसलीही भरपाई अद्यापही मिळालेली नाही. तसेच यांना नोटीसाही देण्यात आलेल्या नाहीत. मोर्बा घाट या मूळ रस्त्याची जमिन १९७१ ला संपादित करण्यात आली होती. मात्र हा रस्ता खूप जूना आहे व अरूद तसेच अवघड वळणाचा होता. व त्यामुळे शासनाने मोर्बा ते साई मार्गावरील नाईटणे गावापासून जो पूर्वीपासून नागरिकांची व पायवाट होती. त्याच पायवाटेवरून पर्यायी के मार्ग सन १९९८-९९ मध्ये ३ कि.मी. अंतराचा रस्ता नव्याने केला. मात्र या रस्त्यात बाधित झालेल्या शेतकर्यांना कसलीही भरपाई त्यावेळीही देण्यात आली नाही. मात्र हा रस्ता होत असल्याने आपला विकास होईल या हेतूने ते शेतकर्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र पुन्हा याच रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने त्यातही अनेक शेतकरी बाधित हे होत आहेत. मात्र कॉरिडॉर अंतर्गत मुंबई गोवा महामार्गावर बाधित कुटुंबाना शासनाने अनेक पटीने दर देउन नुकसान भरपाई दिली. तर या चार गावातील शेतकरी व नागरिकांना एकही रूपया नुकसान भरपाई शासनाने दिली नाही. त्यामुळे शासनाच्या दुटप्पी धोरणाचा बाधित कुटुंबे निषेध करीत आहेत.

Post a Comment