दिवेआगर :
श्रीवर्धन तालुक्यात नागरी हक्क संरक्षण संघटनेच्या कामला वेग येत असून नागरी हक्क सरक्षण संघाची सर्वसाधारण सभा श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे तालुकाध्यक्ष ओमकार शेलार यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. याप्रसंगी नागरी हक्क संरक्षण संघाचे श्रीवर्धन तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत बिराडी ,अमित तोंडलेकर, दिलीप नाक्ती ,संतोष शिलकर ,चेतन परकर ,सुरेश चंजेरी ,किरण भंडारी ,मयूर परकर ,आदि मोठ्या संख्येत उपस्थित होते यावेळी तालुका कार्यकारणी निवडी बाबत चर्चा करण्यात आली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन तालुक्यात नागरी हक संरक्षण संघ संघटनेच्या कामाने वेग धरला आहे.

Post a Comment