न्यू इंग्लिश स्कुलच्या शैक्षणिक प्रगतीबाबत शिक्षक-पालकवर्ग समाधानी...
म्हसळा,
परमपूज्य डॉ.बापुजी साळुखे शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल म्हसळामधील म सेमी इंग्रजी विषयाचे विद्यार्थी अस्खलित इंग्रजी बोलू लागले आहेत. या विद्यालयाने अध्यापनासह सर्वच क्षेत्रात कमी अवधीत खुपच चांगली प्रगती केल्याने या शाळेने चालू वर्षा एक पाऊल पुढे टाकले आहे. हे शाळेतील पाचवी ते दहावीतील सेमी इंग्रजी वर्गातील बहुतांश विद्यार्थी अस्खलीत इंग्रजी बोलू लागले असल्याची झलक नववी अ आणि ब वर्गाचे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नियोजन समितीच्या संपन्न झालेल्या संयुक्त सभेत प्रत्यक्ष पालकवर्गास आपले पाल्य इंग्रजीत बोलताना अनुभवता आल्याने सर्वानीच आनंद व समाधान व्यक्त केले आहे आठवड्यातील शेवटचा शनिवार इंग्लिश डे असा उपक्रम शाळा प्राचार्य वी.एम.माळी, संचालक समीर बनकर, वर्गशिक्षक सचिन गायकवाड, अंकुश पेठे यांनी राबविण्याची संकल्पना कृतीत आणण्यासाठी विध्यार्थी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पंचायत समिती विस्तार अधिकारी दिघीकर, तोंडसुरे मराठी शाळा प्राचार्य दिलीप जाधव, सदस्य भालचंद्र दातार, खारगाव खुर्द माजी सरपंच मेंदाडकर, पर्यंव्यक्षक महामुलकर आदी पालक, शिक्षक आणि विध्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत विद्यार्थीवर्गाने इंग्रजी भाषेत धीरगंभीरपणे माझी शाळा, शाळेचे प्राचार्य माळी आणि अध्यापन करणारे शिक्षक यांच्या कामाचे संभाषणातून कौतुक केले. 'न्यू इंग्लिश स्कूलचा एक दिवस इंग्लिश करिता हा उपक्रम पालकांना चांगलाच भावल्याने सभेला उपस्थित पालकांनी शिक्षक व व्यवस्थापन समितीला धन्यवाद दिले.

Post a Comment