घुम : म्हसळा तालुक्यातील देहेन या गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर होता. ग्रामस्थ मंडळाने ग्रामस्थाच्या श्रमदानातून पाण्याची टाकी बांधली. या पाण्याच्या टाकीचे उदघाटन सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी तथा देहेन नर्सरीतील वरिष्ठ अधिकारी महादेव बावचकर यांच्या हस्ते १८ डिसेंबर रोजी करण्यात आले. महादेव बावचकर यांच्या प्रयत्नाने मुंबई येथील सेल्फ हेल्थ एंड प्लस एमपावरमेन्ट मुंबई, या सामाजिक संस्थेने ८० हजार रु. आर्थिक मदत देऊन पाण्याच्या चार टाकी बांधकामासाठी त्यांच्या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन आर्थिक मदतीचा हाथ पुढे केला. तसेच ग्रामविकास युवा संघटना देहेन यांनी किमान १ लाखापर्यंत खर्च केले आणि महिला मंडळाच्या वतीने श्रमदान करण्यात आले. पाण्याची टाकी बांधण्यासाठी एकूण २ लाख रुपयांचा खर्च करून गावातील पाण्याचा प्रश्न सर्वांच्या सहकार्याने एकमेका साहाय्य करू असे म्हणत सर्वांच्या एकजुटीने हा प्रश्न सोडविण्यात यश आले. यावेळी मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुरेश ठोंबरे, ग्रामीण अध्यक्ष धोंडु अलिम, उद्योजक शंकर ठोंबरे, उपाध्यक्ष गणपत गोणबरे, रावजी घाणेकर, नियोजन प्रमुख अनिल जोशी, महिला मंडळ अध्यक्षा मीनाक्षी जोशी, उपाध्यक्ष अनिल जोशी, सचिव
निलेश गोणबरे यांसह ग्रामस्थ व महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment