रस्त्याच्या मंजूर कामावरून म्हसळ्यात रंगलाय श्रेयवाद...रस्त्यांची अवस्था मात्र मात्र जैसे थे! -

रस्त्याच्या मंजूर कामावरून म्हसळ्यात रंगलाय श्रेयवाद रस्त्याच अवस्था मात्र मात्र जैसे थे! -
कोणीही करा पण रस्ते करा- नागरिकांची विनवणी

घुम : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहेत्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वर्षापासून डांबरी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खट्टा आहे की, खड्यात रस्ता आहेहेच नागरिकांना समजत नाही. म्हसळ्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षांना अनेक वेळा ग्रामस्थांनी विनवण्या करूनही कोणीही या रस्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेताना दिसून येत नाही. यामुळे तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांवर जनता नाराज झाली आहे तालुक्यातील सांगवडठाकरोली, कोकबलघुम, रुद्रवट, नेवरूळ, सकळप कोंड, जांभूळ, कोळवटचिरगाव, भापट, पांगळोली, पास्टी, कुडगाव, मांदाटने या दुर्गम व डोंगराळ भागातील गावांना तालुक्यापासून जोडणार्या मुख्य डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून दुरवस्था झाली आहे. या भागातून हजारो विद्यार्थी नेवरुळ, पाटी, पांगतोली, म्हसळा  येथे जातात. शासकीय कामासाठी, नोकरी व्यवसायानिमित्त, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक रोज मोठ्या प्रमाणात येत असतात. सद्य स्थितीला या रस्त्यावर खूप मोठेमोठे खडे पडल्याने व ही परिस्थिती गेली कित्येक वर्ष अशीच असल्याने या भागातील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी सहन करुन जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत. मात्र ! स्थानिक नेते मंडळींनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडून रस्त्यांच्या मंजुरीवरून आपापल्या पक्षाचा डंका वाजविण्यास सुरुवात केली आहे.

नुकतेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वाडांवा ते सांगवड, जळदेहेन ते पांगळोली हे रस्ते मंजूर झालेले आहेत. मात्र या रस्त्यांच्या मंजुरीवरून म्हसळ्यात राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाचे शीतयुद्ध रंगलेले पहावयास मिळत आहे मात्र १५-२० वर्षांपासून रस्त्यांवरील खड्डयातून प्रवास करणारी जनता आता कोणत्याही पक्षाच्या नेत्यांच्या आश्वासनाला व भूलथापांना बळी न पडता कोणीही करा, पण चांगले रस्ते करा अशी विनवणी करीत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना या भागातील लोकांनी ज्यांना आपले बहुमूल्य मतदान केले, त्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडेवेळ नसून या भागातील जनतेकडे त्यांनी अक्षरशः पाठ फिरवली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे निवडणुका जवळ आल्या की, गोड बोलून लोकांची दिशाभूल करीत मतांची विभागणी करताना या भागातील विकासाला खो घालण्याचा दुर्दैवी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे जास्त लक्ष द्यावे, असा सल्ला या गावातील नागरिक देत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा