गावागावातील विकास कामे करुन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी कटिबद्ध - आदितीताई तटकरे

घुम : श्रीकांत बिरवाडकर म्हसळा तालुक्याला विकास कामांबाबत झुकते देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा तालुक्याचा विकास
हाच आमचा ध्यास हा घेतलेला वसा विविध विकास कामे करून सत्यात उतरवला आहे असे सांगून मतदारसंघात विकासकामे करणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे आद्य कर्तव्य आहे असे प्रतिपादन दि.१५ डिसेंबर रोजी म्हसळा तालुक्यातील खरसई, दगडघुम या गावातील जनसुविधा योजनेंतर्गत मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांनी केले आहे यावेळी आदिती तटकरे यांनी पुढे सांगितले की गावागावातील विकास कामे करुन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहेत. तसेच जनतेने विश्वासाने निवडून दिलेले आहे त्यामुळे गाव, वाडीवस्तीवर विकासकामे करणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे आद्य कर्तव्य आहे तालुक्यातील जनतेची कामे करीत असल्यानेच प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जनता निवडून देते असा टोला विरोधकांना लगावला. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून होत असलेली विकास कामे चांगल्या दर्जाची होणे अपेक्षित आहेत असे सांगून स्थानिक लोकप्रतिनिधीनी योग्य लक्ष देऊन ठेकेदाराकडून चांगल्या दर्जाचे काम करून घ्यावे अशा सूचना दिल्या. यावेळी खरसई कोळीवाडा येथे मच्ची सुकविण्याचा ओटा बांधणे रकम ५ लक्ष, खरसई बंदरावर निवारा शेड बांधणे रक्कम ५ लक्ष, दगडघुम स्मशानाकडे जाणारा रस्ता करणे रक्कम ३ लक्ष, निगड दगडघुम येथे सामाजिक सभागृह बांधणे रक्कम ७ लक्ष अशा विकास कामांचे भूमिपूजन अध्यक्षा आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात यावेळी अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या समवेत पंचायत समिती सभापती उज्वला सावंत, जिल्हा परिषद सदस्या धनश्री पाटील, तालुका अध्यक्ष नाझीमभाई  हसवारे, माजी प्रतोद तथा रायगड जिल्हा महिला उपाध्यक्ष वैशालिताई सावंत, पंस.सदस्य संदीप चाचले, सदस्या छाया म्हात्रे, महिला तालुका अध्यक्षा रेश्मा कानसे, श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ सरचिटणीस व्यंकटेश सावंत, युवक अध्यक्ष संतोष पाखड, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष रियाझ फकी, सरपंच अंकुश खडस, अनिल बसवत, संतोष सावंत, सुरेश जाधव यासह पदाधिकारी, सरपंच व ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा