म्हसळा : महेश पवार
म्हसळा तालुका म्हणजे निसर्गाचा वरदान ठरलेला तालुका शासनाच्या विविध योजना पारदर्शक पद्धतीने व अचूक नियोजन करुण गावागावात राबवून खेडेगावांचा विकास केला आहे. त्यातील एक ग्रामस्थांच्या सहकार्यातून तालुक्यातील दुर्गम , डोंगराळ भागातील ३९ ग्रामपंचायती मध्ये एकूण १३८ वनराई बंधण्याचा बहुमोल कार्य म्हसळा पंचायत समिती मार्फत ८३ गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामपंचायतीच्या सहायाने गावानजीक जाणारा पाण्याचा प्रवाह अडवून २५ मिटरपेक्षा ज्यास्त लांबीचे वनराई बंधारे बांधण्यात आले. हे बंधारे बांधल्यामुळे पावसाचे वाया जाणारे हजारो लिटर पाणी भूगर्भात जीरणार आहे व या बंधाच्यात साठलेले पाणी वन्य जीवांना व गुराना पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हे वनराई बंधारे उपयुक्त ठरणार आहेत. तालुक्यात केलटे, निगडी, कांदळवाडा, वरवठणे , रेवली, खरसई, वारळ, काळसूरी, तुर्बाडी, रोहीणी, मेंदडी, पाभरे, भे. कोंडम दािटने,खामगाव, कुडगांव, कणघर,लेप, खारगांव खु, कोळवट, ठाकरोली,तोंडमुरेनेवरूळ, आडी म.खाडी , कोळेसंदेरी, आंबेत, लिपणी वावे फळसप,थुम,जांभूळ, साळवंडे, गोडघर, चिखलप, खारगांव बु, पांगळोली , तोराडी, घोणसे , देवघर या ३९ ग्रामपंचायती मध्ये सर्वच ग्रामसेवकांने उत्तम काम केल्याचे गट विकास अधिकारी प्रभे यांनी सांगितले आहे त्यांच्या सहकार्यातून ग्रामस्थानच्या श्रमदानातून व सरपंच सदस्य यांच्या नियोजनातून दर्जेदार काम केले आहे . सर्व ग्रामपंचायती पेक्षा ग्रुप ग्रामपंचायत केलटे ग्रामपंचायतीने तब्बल २५ मिटर पेक्षा लांबीचे ६ वनराई बांधण्याचे काम केलटे ग्रामस्थ , महिला मंडळ , सरपंच , ग्रामसेवक , सदस्य यांणी विशेष मेहनत घेतली आहे पाणी साठविण्यासाठी कमी खर्चात व कमी वेळेत बंधारे बांधल्याने ग्रामस्थांचा व शासनाचा आर्थिक भार यामुळे कमी झाला आहे म्हसळा तालुक्यालाच न्हवे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याला एक आदर्श संदेश दिला आहे हे वनराई बंधारे बांधण्यासाठी सरपंच , सदस्य , गट विकास अधिकारी प्रभे , विस्तार अधिकारी दिघीकर, सर्व ग्रामसेवक ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व महिला वर्ग तसेच ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.
बंधारा बांधण्याचे महत्त्वाचे फायदे...
गाभा भिंतीसाठी माती लागत नाही,सुपीक मातीची दरवर्षी होणारी खूप मोठ्या प्रमाणात कमी होते, जमिनीची सुपीकता टिकून राहते,प्लॅस्टिक अस्तरणामुळे नाल्यातून पाझरणारे पाणी कमी होते आणि पाणी जास्त वेळ टिकते,लोक सहभागातून जलसंधारण साधता येते,कमी खर्चामध्ये जास्त वेळ पाणी अडविता येते,अडविलेले पाणी पूरक सिंचनासाठी तसेच जनावरासाठी वापरता येते विहीर पुनर्भरणासाठी मदत होते. अशा प्रकारच्या बंधार्यामुळे उन्हाळ्यात जाणवणाच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सोडविता येते...
भागात मुळातच पाऊस कमी पडतो आणि पडणारा पाऊस थोड्या दिवसात पडून जातो, त्यामुळे जवळ जवळ वर्षभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची पाळी ग्रामीण भागातील जनतेवर विशेषतः महिलांवर येते. १३८ वनराई बंधारे ३९ ग्रामपंचायतीच्या पाणवट भागात बांधण्यात आलेआहे. त्याचा फायदा शेती, बगीचा, वन्य प्राणी सह अनेकांना चांगलाच फायदा होणार आहे.
-वाय.एम. प्रभे, गट विकास अधिकारी,
पंचायत समिती म्हसळा

Post a Comment