माणगाव-दिघी रस्त्याचे काम जलदगतीने सुरू...

माणगाव-दिघी रस्त्याचे काम जलदगतीने सुरू
साई : हरेश मोरे

माणगाव दिघी रस्त्याचे काम अत्यंत जलदगतीने सुरू आहे. माणगाव दिघी हे ५५ कि.मी अंतर असून या रस्त्याचे काम जे.एमम्हात्रे इन्फ्रा.प्रा.लि.कंपनीने घेतले आहे. या रस्त्याबाबत माहिती घेतली असता सदर रस्त्याचे काम हे ३ वर्षाच्या कालावधी मध्ये पूर्ण करून दयायचे ठरले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व स्थानिक जनतेने रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी सहाकार्य व रस्त्याला कामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा केला नाही तर माणगाव दिघी रस्ता हा उत्तम दर्जाच्या व दिलेल्या कलावधीच्या आतमध्ये पूर्ण होईल. त्यामुळे वाहनचालक, व जनतेचा फायदा होईल अशा प्रकारची चर्चा वरीष्ठ  नागरिकांमधून होत आहे दिवेआगर, हरीहरेश्वर, श्रीवर्धन हि पर्यटनस्थळे असून महाराष्ट्रातून अनेक पर्यटक हे या ठिकाणी सुट्टीच्या कालावधीमध्ये मनमुराद आनंद लुटण्यासाठी येत असतात. या विभागामध्ये पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने स्थानिक तरूणांना रोजगार उपलब्ध होत असून येणार्या पर्यटकांना राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था करून देणे यामध्येच येथील स्थानिक तरूणांना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे. मुंबई, पुणे या ठिकाणी येथील तरूण कामानिमित्त जातात ते याच ठिकाणी रोजगार उपलब्ध झाल्यामुळे जाणार नाही. त्याकरीता पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यासाठी सुसज्ज रस्त्यांची आवश्यकता असणे गरजेचे आहे. माणगावदिघी रस्ता हा सुसज्ज व चांगल्या प्रतीचा होण्यासाठी स्थानिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहेहा रस्ता जनहिताचा होत असल्याने भविष्यात अनेक रोजगार या विभागात उपलब्ध होतील व तरूण बेरोजगार राहणार नाही त्यांच्या रोजगारामध्ये वाढ होईल. तसेच या रस्त्यामुळे दळणवळण, व्यापार यामध्ये सुद्धा वाढ होईल. परंतु शासनाने या महामार्गासाठी ज्या शेतकर्यांच्या जागा बांधकाम झालेली घरे भूसंपादीत होणार आहे. त्यांना नोटीस देउन त्यांना त्यांच्या जागेचा मोबदला मिळणे आवश्यक आहे. शासनाच्या संबंधित खात्याने शेतक-यांना विश्वासात घेउन काम केले पाहिजे. मुंबई-गोवा महामार्ग ज्या प्रमाणे, खोळंबला आहे व काम अपूर्ण आहे तो प्रकार होऊ नये याकरीता संबंधित अधिकारी व लोकांनी ठेकेदारांना सुद्धा सहकार्य करणे गरजेचे आहे अशी जनतेकडून मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा