महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या विद्यमाने म्हसळा येथील कन्या शाळा म्हसळा येथे खामगाव बीटाच्या 100 टक्के विद्यार्थ्यांचा मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदर प्रशिक्षणात खामगाव बीटातील सहा केंद्रातील शिक्षकांनी सहभाग घेतला.
येत्या मार्च अखेरपर्यंत राज्यातील वाचनामध्ये विद्यार्थी प्रगत होतील हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे.सदर प्रशिक्षणास मार्गदर्शक म्हणून प्रकाश खडस,किशोर पैलकर, प्रकाश मांडवकर,दीपक पाटील,अनिल बेडके,धामणकर सर,कळस सर,गटसमन्वयक कोळेकर सर यांनी मार्गदर्शन केले.खामगाव बीटातील सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाची अंमलबजावणी आनंददायी पद्धतीचा वापर करत प्रभावीपणे राबवावी असे आवाहन तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.गजानन साळुंखे सर यांनी केले.

Post a Comment