म्हसळा:- रायगड जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट असोशिएशन संलग्नित म्हसळा तालुका टेनिसबॉल क्रिकेट असोशिएशनचा पाचवा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.यावेळी रायगड जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटनेचे संस्थापक संतोष गुरव यांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली.स्वर्गीय संतोष गुरव सरांनी स्वतः म्हसळा सारख्या ग्रामीण तालुक्यात येऊन संघटनेचे काम उभे केले होते त्यांच्या स्मृतींना सर्वांनी उजाळा दिला.यावेळी म्हसळा तालुका टेनिसबॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष निलेश मांदाडकर,सचिव हेमंत पयेर यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.तालुक्यातील खेळाडूंना टेनिसबॉल क्रिकेट मध्ये राज्य राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करता यावी म्हणून विशेष प्रयत्न करणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले
म्हसळा तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोशिएशनचा पाचवा वर्धापन दिवस साजरा...
Admin Team
0

Post a Comment