भजन स्पर्धेत सोमजाईदेवी भजन मंडळ द्वितीय..


म्हसळा वार्ताहर :- न्यु सातारा समुह पतसंस्था आयोजित अखिल मुंबई भजन स्पर्धेमध्ये म्हसळा तालुक्यातील श्री सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळाला द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले.सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळाचे सुप्रसिद्ध भजनी बुवा संतोष शितकर व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या अभंग व इतर सुरबद्ध गीतांना प्रेक्षकांची दाद मिळाली.या पूर्वी महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळ परिषद मुंबई ,विजय क्रीडा मंडळ भजन स्पर्धा मुंबई,लोकसेवा समिती डोंबवली,श्री दत्तकृपा संगीत विद्या प्रसारक मंडळ मुंबई ,हिंदुस्थानी संगीत अकादमी इत्यादी संस्थांनी आयोजित केलेल्या नामांकित स्पर्धांमध्ये संतोष शितकर यांनी अनेक पारितोषिके पटकावली आहेत.त्याचप्रमाणे रायगड,रत्नागिरी,सिधुदुर्ग ठाणे जिल्ह्यासह मुंबईत भाजनरुपी सेवा देऊन भक्ती व संगीत भजन शिस्तबद्ध पद्धतीने रसिकांसमोर सादर करून समाजप्रबोधन करीत आहेत.त्यांच्या यशाबद्दल आगरी समाजाचे जेष्ठ नेते परशुराम मांदाडकर,आगरी समाज अध्यक्ष रामदास कांबळे, उपाध्यक्ष भाऊ पयेर,सरपंच महादेव कांबळे ,माजी सरपंच निलेश मांदाडकर,पोलीस पाटील काशीनाथ शितकर,भाऊ म्हात्रे,तंटामुक्त समिती अध्यक्ष जनार्धन पयेर,ग्राम पंचायत सदस्य रामचंद्र कोकाटे,कानूबुवा शितकर,हरीचंद्र कांबळे,पांडुरंग खोत,समीर कांबळे,यशवंत शितकर,अजय पयेर यांच्यासह तालुक्यातील नागरिकांनी विशेष कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा