जागतिक एड्स दिन " आणि आशा दिनाचे औचीत्य साधून म्हसळा शहरामध्ये आरोग्य विभागाची भव्य रॅली
म्हसळा : सुशील यादव
म्हसळा शहरामध्ये जागतिक एड्स दिन व आशा दिनाचे औचीत्य साधीत शहरातुन आरोग्य विभागाकडून काल ( १ डिसेंबर ) भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक एड्स दिन व पंधरवडा निमित्त म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये एचआयव्ही, एड्स जनजागृतीवर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे नियोजन म्हसळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ . सुरज तडवी,डॉ. गजानन भारती , रा.जी.प.आरोग्य कर्मचारी संधटना अध्यक्ष अमोल खैरनार , आरोग्य विस्तार अधिकारी महेश पाटील तसेच म्हात्रे यांनी केले होते .या रॅलीची सुरवात म्हसळा ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणातुन करण्यात आली. तद्नंतर रॅली मार्गस्थ होऊन तहसिल कार्यालयासमोरून,सोनार आळी धावीर मंदीर परीसर मार्गे पुन्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला.या रॅलीमध्ये सर्व "आशा " व वसंतराव नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थीत होते.
या रँलीमध्ये एचआयव्ही एड्स विषयी घोषवाक्यांच्या माघ्यमातुन जनजागृती केली गेली . ''एचआयव्ही एड्सला हद्दपार करायचे आहे '' , हस्तांदोलन केल्यानेे, रक्तदान केल्याने ,एकमेकांचे कपडे वापरल्याने तसेच अनेक अन्य गोष्टींमुळे एड्स हा आजार होत नाही. अशा घोषणा देण्यात आल्या. एड्स संदर्भात समाजामध्ये असलेल्या अनेक गैरसमज यांचीही माहीती देण्यात आली.त्याचप्रमाणे एचआयव्हीचा प्रतिबंध या विषयावरही घोषवाक्यांचा वापर करण्यात आला. तसेच ग्रामीण भागात घराघरा पर्यंत आरोग्य सेवेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या " आशा स्वयंसेविका " यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने १ डिसेंबर हा दिवस आशा दीन म्हणून साजरा करण्याचे ठरविले होते त्या प्रमाणे जागतिक एड्स दिना सोबतच आशा दिन सुद्धा साजरा करण्यात आला आहे असे म्हसळा तालूका आरोग्य अधिकारी डॉ. सुरज तडवी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .या रॅलीमध्ये म्हसळा तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके, सहा.पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड म्हसळा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष नाझीम हसवारे , अनिल बसवत या मान्यवरांसमवेत म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील व प्राथमिक आरोग्य केंद्रामधील सर्व कर्मचारी उपस्थीत होते.
Post a Comment