एस.जी.कुडेकर इंटरनॅशनल स्कूल च्या पहिल्या स्नेहसंमेलनास नगराध्यक्षा, नगरसेवकांची हजेरी



म्हसळा : सुशील  यादव
म्हसळा शहरात सी.बी.एस.सी. अभ्यासक्रम असलेल्या एस.जी.कुडेकर इंटरनॅशनल स्कूलच्या पहिल्या तीन दिवसीय स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी(७ डिसेंबर) म्हसळा शहराच्या नगराध्यक्षा कविता बोरकर, नगरसेविका संपदा पोतदार यांच्यासहित भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्षा सरोज म्हशीलकर, भाजप रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य मंगेश म्हशीलकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख अनंत नाक्ती यांनी भेट दिली. एस.जी. कुडेकर इंटरनॅशनल स्कूल ची शिस्त पाहून समाधान वाटले असे नगराध्यक्षा बोरकर यांनी या कार्यक्रम प्रसंगी सांगितले व शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुडेकर, किशोर बोरकर, शिक्षणतज्ञ दीपक पाटील, मुख्याद्यापिका सौ. गजगे, पूजा जैन, किशोर बोरकर, संतोष उद्धरकर, विधी साळुंखे आदी मान्यवरांसाहित पालक विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा