राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी हर्षदा म्हसकरची निवड ...


मेंदडी वार्ताहर :- कराड येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धेसाठी रायगडच्या महिला संघात म्हसळा तालुक्यातील खरसई गावची सुकन्या हर्षदा म्हसकर हिची निवड करण्यात आली.हर्षदा जय हनुमान दिवेआगर या संघातून खेळत असून रायगड जिल्ह्याच्या महिला कबड्डी संघात अनुभवी खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी प्राप्त झाली आहे.म्हसळा सारख्या ग्रामीण भागातील मुलगी प्रथमच रायगडच्या संघात खेळत असल्याने तालुक्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.हर्षदाच्या यशात तीचे प्रशिक्षक निकेश कोसबे यांचा मोलाचा वाटा आहे.रायगड जिल्हा कबड्डी असोशिएशनचे कार्याध्यक्ष आस्वाद पाटील,म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील कबड्डी मंडळे, शेकाप तालुका चिटणीस संतोष पाटील,युवक अध्यक्ष निलेश मांदाडकर,कृषी उत्त्पन्न बाजार समिती संचालिका गौरीताई पयेर,शेकाप विधी सेल तालुका अध्यक्षा ऍड अरुणा मांदाडकर,खरसई आगरी समाज अध्यक्ष रामदास कांबळे,सरपंच महादेव कांबळे,स्वप्नील बिराडी,महिला आघाडी अध्यक्षा सुलोचना लोनशिकर,महिला मंडळ पदाधिकारी अनिता मेंदडकर,मनीषा खोत,पुष्पा मेंदडकर,कौसल्या म्हसकर,माजी सरपंच हर्षल मांदाडकर यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा