डुकराच्या हल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला वन विभागाकडून रु. १ लाखाची नुकसान भरपाई , तहसीलदारांच्या हस्ते पयेर यांना धनादेश सुपूर्द
म्हसळा : सुशील यादव
रान डुकराच्या हल्यात जखमी झालेल्या मेंदडी येथील शेतकऱ्याला वन विभागाकडून रु. १ लाखाची नुकसान भरपाई देण्यात आली. महादेव पयेर यांना रु १ लाखाचा धनादेश म्हसळा तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके व पंचायत समिती सदस्या छाया म्हात्रे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की महादेव गोविंद पयेर , रा. मेंदडी, ता. म्हसळा हे दि. १२/१०/२०१७ रोजी नेहमीप्रमाणे आपल्या शेतावर कामासाठी गेले असता भात शेतातून बाहेर येणाऱ्या भल्या मोठ्या रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला, या हल्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. पयेर याना बोर्ली-पंचतन येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. परंतु गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ मुंबई येथील के.इ.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे पयेर यांना उपचारासाठी तब्बल १ महिना ठेवण्यात आले होते व आजही त्यांच्या जखमा पूर्ण बऱ्या झालेल्या नाहीत. या दुर्देवी घटनेत त्यांच्या साठी हि लाखाची नुकसान भरपाई म्हणजे या जखमांवर वनविभागाकडून मलम लावण्यासारखीच आहे. हा १ लाखाचा धनादेश सुपूर्द करतेवेळी म्हसळा तालुक्याचे वनक्षेत्रपाल व्ही.एन. पवळे, नायब तहसीलदार भिंगारे, वनपाल बी.के. गोरनाक, एस.जी. म्हात्रे, वनरक्षक संजय भागवत, संजय चव्हाण, लिपिक कोसबे, हरिश्चंद्र पाटील, महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महादेव पयेर यांना रु.१ लाखाची नुकसान भरपाई मिळाली याबद्दल वनविभागाचे आभार. हि नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वनक्षेत्रपाल पवळे, वनरक्षक भागवत यांच्या समवेत लिपिक कोसबे यांनी खूप सहकार्य केले. या विषया संदर्भात पाठपुरावा करीत असताना स्थानिक वनविभागाने दाखवलेली तत्परता व सहकार्य यामुळे प्रथमच एवढी मोठी नुकसान भरपाई दिली गेल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना वनविभागाकडून एक चांगला संदेश प्राप्त झाला आहे.महेश पाटील, भाजप, रायगड जिल्हा युवा मोर्चा चिटणीस
महादेव पयेर यांना वनविभागाने दिलेली रु १ लाखाची नुकसान भरपाई हि आजपर्यंत वनविभाग रोहा अंतर्गत येणाऱ्या तालुक्यांमधील दिल्या गेलेल्या नुकसान भरपाईत सर्वाधिक आहे. अजूनही नुकसान भरपाई साठी शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत.त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार.व्ही.एन. पवळे , वनक्षेत्रपाल , म्हसळा तालुका
मला वनविभागाकडून योग्य नुकसान भरपाई दिल्याबद्दल वनविभागाचे आभार. तसेच माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याला सदर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी हरिश्चंद्र पाटील, महेश बा. पाटील , महेश धर्मा पाटील , सुनंदा पाटील यांनी पाठपुरावा केला त्याबद्दल मी वानविभागासहित या सर्वांचा देखील ऋणी आहे.महादेव गोविंद पयेर, पिडीत शेतकरी, मेंदडी छाया : सुशील यादव
Post a Comment