कळटे ग्रामस्थांनी बांधले सहा वनराई बंधारे...

म्हसळा : महेश पवार
म्हसळा तालुक्यातील केलटे ग्रुप ग्रामपंचायत मधील केलटे महिला मंडळ व ग्रामस्थांच्या श्रमदानातून ग्रामपंचायतीच्या सहायाने गावानजीक व गावाशिवारातील पाणतलभागात नदी, नाळे, देऊळ, रहाट, गोठण, शंकर मंदिर, मार्गे जाणारा पाण्याचा प्रवाह अडवून २५ ते १५ मिटरचे सहा वनराई बंधारे बांधण्यात आले. हे बंधारे बांधल्यामुळे पावसाचे वाया जाणारे हजारो लिटर पाणी भूगर्भात जीरणार आहे. या बंधाच्यात साठलेले पाणी वन्य जीवांना व गुरांना पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. त्याच भागात नारळ सुपारी अन्य झाडांची बागायत आहे. त्या बागायतसाठी या बांधाच्याचा चांगलाच फायदा होणार आहे. तसेच शासनाची पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्प ह्या मार्गातून पूर्ण होणार आहे. केलटे ग्रामस्थ निस्वार्थ पणाने हे कार्य गेले अनेक वर्ष करीत आहेत त्यामुळे पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हे वनराई बंधारे उपयुक्त ठरणार आहेत. पाणी साठविण्यासाठी कमी खर्चात व कमी वेळेत बंधारे बांधल्याने ग्रामस्थांचा व शासनाचा आर्थिक भार यामुळे कमी झाला आहे. अशा प्रकारचे वनराई बंधारे केलटे येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून आहे. गावातील सर्व ग्रामस्थ व महिलामंडळ शासनाला वेळोवेळी मदत करतात.
शासनाने सुचवलेले काम निस्वार्थ पणाने आजवर केले आहे त्या मुले आमच्या ग्रुप ग्रामपंचायती कडून विशेष आभार मानत  असल्याचे ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश बोर्ले यांनी सांगितले आहे. हे बांधण्यासाठी सरपंच आर सदस्या मंदिनी धाडवे. गणेश बोर्ले, अध्यक्ष अनंत धाडवे,  सर्व ग्रामस्थ महिला मंडळ, भुपेश अहिरे, ज्ञानेश्वर या सगळ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा