टीम म्हसळा लाईव्ह...
सातारा येथे पार पडलेल्या चॅम्पियन कराटे क्लब आयोजित राष्ट्रीय चॅम्पियन कराटे कप २०१७ मध्ये म्हसळा येथील आठ वर्षीय विद्यार्थी कु.विक्रांत विश्वास खांडेकर याने प्रथम क्रमांक पटकावून म्हसळा तालुक्याच्या वैभवात एक मानाचा तुरा लावला आहे.सातारा येथील चॅम्पियन कराटे क्लब यांनी राष्ट्रीय पातळीवरचे कराटे स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत पिवळा पट्टयातील गटामध्ये म्हसळा येथे शिकणारा कु.विक्रांत विश्वास खांडेकर या आठ वर्षीय शाळकरी मुलाने आपले कर्तब दाखवत प्रथमं क्रमांक प्राप्त केला.विक्रांत ने काता व फाईट खेळामध्ये अनुक्रमे गोल्ड मेडल पटकावून प्रथम स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.या आधी देखील विक्रांतने अनेक सपर्धा आपल्या नावावर करून आपल्या गावासाहित आई बाबांचे नाव उज्वल केले आहे.
Post a Comment