श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन शहरातील मच्छिमार्केट परिसरात एका नागरिकाने अजब चमत्कार केला आहे, चक्क एका रात्रीमध्ये रस्त्याला लागूनच भलीमोठी पत्र्याची शेड वजा टपरी उभी करून त्या ठिकाणी शहाळी विकण्याचा धंदा सुरु केला आहे. विशेष बाब म्हणजे या टपरीच्या शेजारी तत्कालीन मंत्री सुनिल तटकरे यांनी नविन मच्छिमार्केटचे भूमीपूजन केलेले आहे. तसेच सदरची जागा नगरपरिषदेच्या मालकीची आहे. मात्र सदराची टपरी उभी करणारया इसमाला नगरपरिषदे कडून कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. सदर अनधिकृत टपरी उभारणाच्या नागरिकाला काही सत्ताधारी नगरसेवकांची फुस असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. टपरी रस्त्याच्या एकदम जवळ असल्याने व जवळच रिक्षा स्टॉप असल्यामुळे याठीकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मात्र नगरपरिषद प्रशासन का गप्प आहे? याबाबत नागरिकांना कोडे पडले आहे. सदर जागेबाबत श्रीवर्धन नगरपरिषद व पूर्वीचे जागा मालक यांच्यात वाद असुन हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हे बांधकाम कसे झाले? या प्रकारा बाबत नगरपरिषद काय कारवाई करते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment