श्रीवर्धन मच्छिमार्केटअनधिकृत टपरीवर नगरपालिकेची कारवाई...

श्रीवर्धन : प्रतिनिधी,
श्रीवर्धन शहरातील मच्छिमार्केट परिसरात एक अनधिकृत टपरी उभारण्यात आली होती. एका रात्रीत ही टपरी बांधण्यात आली होती. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास श्रीवर्धन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे या आपल्या सहकारी कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्तासह एक जेसीबी व ट्रैक्टर घेऊन अनधिकृत टपरी हटविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र टपरी बांधणा-याने आपण स्वखर्चाने दोन दिवसात टपरी हटविण्याचे लेखी पत्र दिल्याने नगरपरिषदेचने कारवाई स्थगीत केली असल्याची माहिती मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा