प्रतिनिधी,
श्री सोमजाई फाऊंडेशन सामाजिक संस्थेने तालुका श्रीवर्धन मधील मौजे पांगलोली या गावातील कु.कमलेश गणपत लाड यांना वैद्यकीय उपचाराकरिता पाच हजार रुपये आर्थिक मदत करून एक हात मदतीचा पुढे केलेला आहे. कमलेश लाड हा २६ वर्षाचा युवक काही महिन्यांपासून एका आजाराने खूप त्रस्त आहे. या आजारावर मुंबई नालासोपारातील नवनीत रुगणालायात त्याच्यावर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आल्या याचा खर्च चार लखापर्यंत गेला आहे. परंतु कमलेश याची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांना अजूनही आर्थिक मदतीची गरज आहे. लाड कुटुंबाला वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज लक्षात घेऊन श्री सोमजाई फाऊंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याची दखल घेत सामाजिक बांधिलकी जपून कमलेश लाड यांच्या घरी जाऊन पूर्ण परिस्थिती पाहून पाच हजार रोख रक्कम कमलेश यांच्या जवळ सुपूर्द केली. तर आर्थिक मदत देऊन सहकार्य केल्याबद्दल लाड कुटुंबीयांनी फाऊंडेशनचे आभार मानले. यावेळी श्री सोमजाई फाऊंडेशनचे अध्यक्ष बबन चिले, चंद्रवदन महाडीक, नागेश महाडीक, राजेंद्र में हाडीक, मंगेश महाडीक, उमेश घोले, भावेश महाडीक, मंगेश चिले, निलेश महाडीक, कल्पेश महाडीक, राहुल महाडीक, पांडुरंग महाडीक, विनोद घोले, अशोक दाभोलकर आदी उपस्थित होते.

Post a Comment