म्हसळा : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कोकणचे भाग्य विधाते बॅरीस्टर अंतुले साहेब यांनी कोकण वासियांकरिता गेल्या पाच वर्षी पूर्वी मुंबई आंबेत कोझरी फुल एस.टी सुरू करून हजारो नागरिकांचा प्रवास सुखकर केला होता. त्या एस.टी. मुळे मुंबईतून येणाच्या चाकरमान्याला सोपे जात होते असे असताना अचानक मुंबई डेपोने ही एस.टी बंद केल्याने अनेक गावातील नागरिकांना खाजगी वाहनाने भरमसाठ पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे .गोरेगावमार्गे आमच्या दररोजच्या प्रवासासाठी अन्य कोणतेही साधन नाही सुखकर प्रवास हे आमच्या संविधानाप्रमाणे हक्क आहे तो आम्हाला प्राप्त व्हावा अशी तिखट खंत त्या मार्गातील नागरिक करत आहेत गेली पाच वर्ष ह्या एस टी फेरीकडे पाहिले नाही राजकीय नेते केवळ आपल्या स्वत:च्या खाजगी वाहनांमधून एसी गाडीतून मजेशीर फिरत आहेत परंतू सामान्य जनतेचे त्यांना काहीच पडले नाही. राजकीय पक्ष केवळ वचननामा देतात पण तो वचननामा माजी मुख्यमंत्री अंतुले यांनी पाळला होता.आमच्या व्यथा आम्ही अनेक राजकीय नेत्याच्या समोर मांडल्या पण अंतुलेनी शिवाय आमचा वाली कोण नाही अशी तिखट प्रतिक्रिया संतप्त नागरीकांनी दिली आहे
या गावांना प्रवास झळ आंबेत,नवीवाडी, मठाचीवाढी, बेलाचीवाढी, संदेरी,गडदाव,फळसब, आम शेत,लिपणीवावे, खारगाव, कुडगाव, पांगलेली, तोराडी, कुबळे,
सुतारवाढी.
नागरिकांना आपल्या हक्काचा प्रवास करण्यास मिळाला पाहिजे त्या संबधीत कार्यालयाशी माहीती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल .ग्रामस्थांची मागणी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. -
दिवाकर रावते, परिवहन मंत्री
हि एस टी बंद झाल्याने आम्हाला प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे आमचे साहेब असते तर हि वेळ आली नसती. साहेब गेले हे आमचे दुर्देव.
- शरद रघुनाथ गुडेकर
(प्रवासी ) अंतुले साहेबांचा चाहता
Post a Comment