घुम : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत हागणदारी मुक्त झालेल्या आहेत व स्वच्छता या विषयात सुद्धा म्हसळा तालुका जिल्ह्यात अग्रक्रमांकावर आहे. असा गाजावाजा मोठ्या प्रमाणात जाहीराती व बॅनर बाजी करून केला जातो. यात पंचायत समितीचा पुढाकार असताना पंचायत समिती म्हसळा यांच्या कार्यालयातील स्वच्छतागृहांची मात्र दुरावस्था झालेली पाहायला मिळते. ही दयनीय दुरावस्था पाहून दिव्याखालीच अंधार असा सुर येथे येणाऱ्या नागरिकांच्या तोंडून उमटत आहे. म्हसळा तालुका पंचायत समिती कार्यालय इमारतीचे नवीन बांधकाम सुरू असल्याने सध्या मागील दीड वर्षापासून पंचायत समिती कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र (जुनी इमारत) येथे स्थलांतरित करण्यात आलेले आहे. तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्वाचे कार्यालय असते. या कार्यालयात रोज अनेक लोक आपली वेगवेगळी कामे घेवून येत असतात. शासकीय कामासाठी ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत शिपाई असे अनेक शासकीय कर्मचारी या कार्यालयात येत असतात. या कार्यालयात काम करणारे पुरुष कर्मचारी व महिला कम चारी यांना स्वच्छतागृहाच्या दुरावस्थेमुळे अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने ही बाब लक्षात घेऊन यावर तात्काळ उपाययोजना करायला पाहिजे अशी मागणी होत आहे.या अस्वच्छ व बंद असलेल्या स्वच्छतागृहांबाबत येथील कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी वर्गाने होत असलेल्या गैरसोयीबाबत संबंधित प्रशासन अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना माहिती दिलेली आहे परंतु याबाबत अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही., यामुळे महिलावर्गात नाराजीचा सुर व्यक्त होत आहे.
●म्हसळा पंचायत समितीचे स्वच्छतागृहाची असलेली दयनीय व अस्वच्छ अवस्था आणि दुर्गंधी यामुळे अनेक महिला, दिव्यांग । व्यक्ती व कर्मचारी यांची गैरसोय होत असल्यामुळे अनेकांनी याबाबतीत । नाराजी व्यक्त केली आहे. तर एकीकडे । तालुक्यातील नागरिकांना स्वच्छतेचे धडे देऊन महत्व पटवून सांगणाच्या पंचायत समितीच्या अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त स्वच्छता गृहाची अवस्था पाहून दिव्याखालीच अंधार असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.
पंचायत समिती कार्यालयातील अस्वच्छ व बंद असलेल्या स्वच्छतागृहामुळे आमची महिलावर्गाची खूप गैरसोय होत आहे याबाबत संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना कळविलेले आहे. तरी लवकरच स्वछ व दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृह उपलब्ध करून मिळावे. - महिला कर्मचारी पंचायत समिती म्हसळा
Post a Comment