आयडियल इंग्लिश स्कूल म्हसळा येथे विज्ञान प्रदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न...

प्रतिनिधी,
आज मंगळवार दिनांक २१/११/२०१७ रोजी म्हसळा तालुक्यातील आयडियल इंग्लिश स्कूल म्हसळा येथे विज्ञान प्रदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्तिथी मा.आदरणीय आदितीताई तटकरे ( अध्यक्षा रायगड जिल्हा परिषद आलिबाग ) यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

विज्ञान प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येने म्हसळा तालुक्यातील सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तरी ह्या विज्ञान प्रदर्शनाचा आनंद आदितीताई यांनी मोठ्या प्रमाणात लुटला. व विध्यार्थ्यांना प्रश्न देखील विचारण्यात आले.
तसेच आदितीताई तटकरे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी पंचायत समिती म्हसळा येथे आढावा मिटिंग पार पाडण्यात आली व या मिटिंगसाठी मोठ्या संख्येने उपस्तिथी होती. 
तरी या कार्यक्रमासाठी आदितीताई तटकरे यांच्या समवेत म्हसळा तालुका अध्यक्ष नाझीम हस्वारे , तसेच जेष्ठ नेते आलिशेठ कौचाली , सभापती उज्वला सावंत , उपसभापती मधुकर गायकर , नगराध्यक्षा कविता बोरकर , उपनगराध्यक्ष नासीर दळवी , जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे , जिल्हा परिषद सदस्या धनश्री पाटील , पंचायत समिती सदस्य संदीप चाचले , सदस्या छाया म्हात्रे , तसेच माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे , तसेच माजी प्रतोद वैशाली सावंत तसेच व्यंकटेश सावंत , शरीफ हस्वारे , नईम दळवी ,जयश्री कापरे , अनिल बसवत , सतीश शिगवण , फैसल गिते , रियाझ घराडे , संतोष पाखड , करण गायकवाड , अशोक काते तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ता व शिक्षकवर्ग व विध्यार्थी यावेळी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा