दिघी, गणेश प्रभाळे
श्रीवर्धन येथील एसटी आगारच्या प्रमुखपदी नव्याने नियुक्त झालेल्या रेश्मा गाडेकर यांचा कास्ट्राईब संघटने तर्फे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. श्रीवर्धन एसटी आगाराच्या व्यवस्थापक पदी नवीन नियुक्ती झालेल्या रेश्मा गाडेकर या पहिल्या महिला व्यवस्थापक आहेत. आगारातील कास्ट्राईब संघटनेच्या श्रीवर्धन शाखा वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष रावसाहेब चित्ते, खजिनदार राहुल गायकवाड, उदय हाटे, पंचांग आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment