कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाचे नेतृत्व मुंबईच्या अभिलाषा म्हात्रेकडे...


प्रतिनिधी,
आशियाई कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाचे नेतृत्व मुंबईच्या अभिलाषा म्हात्रेकडे सोपविण्यात आले असून, हिमाचल प्रदेशाचा अजय ठाकूर पुरुष संघाचा कर्णधार असेल. ही स्पर्धा २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान इराण येथे पार पडणार आहे. 
या स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी महासंघाने हरियाना येथील सराव शिबिरानंतर भारतीय संघाची घोषणा केली. महिला संघात अभिलाषाखेरीज मुंबईच्याच सायली जाधव हिचा समावेश करण्यात आला आहे. पुरुष संघात महाराष्ट्राच्या एकाही खेळाडूला स्थान मिळालेले नाही. सराव शिबिरासाठी महाराष्ट्राच्या रिशांक देवाडिगा, काशिलिंग आडके आणि सचिन शिंगाडे या पुरुष, तर अभिलाषा, सायलीसह पुण्याच्या पूजा शेलार या महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड झाली होती.

संघ - पुरुष - अजय ठाकूर (कर्णधार), दीपक हुडा, महेंद्रसिंह ढाका, मनिंदरसिंग,  मोहित चिल्लर, नितीन तोमर, प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, रोहित कुमार, सचिन शिंगाडे, संदीप नरवाल, सुरेंदर नाडा, सुरजीत, विशाल भारद्वाज

महिला - अभिलाषा म्हात्रे (कर्णधार), कंचन ज्योति दीक्षित, कविता, मनप्रीत कौर, मारिया मोनिका, पायल चौधरी, प्रियंका, प्रियंका नेगी, रणदीप कौर खेडा, रितु, साक्षी कुमारी, सायली जाधव, शमा परवीन, सोनिया.


भारतीय संघाच्या कामगिरीची सर्व जबाबदारी कर्णधार या नात्याने माझ्यावर असणार आहे. भारताचे महिला कबड्डीतील वर्चस्व कायम राखण्यासाठीच आमचा प्रयत्न असेल. यापूर्वीचा स्पर्धा अनुभव मोलाचा ठरेल; मात्र त्याचबरोबर सहकाऱ्यांकडून चांगला खेळ करून घ्यायचा आहे.
- अभिलाषा म्हात्रे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा