प्रतिनिधी,
प्रवाशांच्या
सेवेसाठी ब्रीदवाक्य मिरवणारया एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी
प्रशासनाची विविध मार्गाने धडपड सुरू असली तरी मात्र, श्रीवर्धन एसटी
आगारातून लांब पल्ल्याच्या बसेस बंद केल्या होत्या. मात्र या संबंधाचे
वृत्त प्रसिद्धी माध्यमामध्ये प्रकाशीत झाल्यानंतर या मार्गावरील
प्रवाशांसाठी नानवली - मुंबई एसटी सेवा सुरु करण्यात येणार आहे. याबाबत
विविध मध्यमांनी बातमी लावून धरली अखेर या वृत्ताची दखल घेऊन या
मार्गावरील एसटी सुरु करण्यात येणार आहे. श्रीवर्धन तालुक्यातील वेळास
आगार, आदगाव, सर्वे, नानवली अशा चार गावांसाठी मुंबईकडे जाणाच्या व
मुंबईहून परतणाच्या प्रवाशांना एक हि गाडी नसल्याने प्रवाशाची गैरसोय झाली
होती. गेली पाच वर्षा पासून येथील ग्रामस्थ पत्र व्यवहार करत आहेत मात्र
यावेळी महामंडळाकडून दिलासा मिळाला असुन सोमवार ता. २० नोव्हेंबर पासून
नानवली मुंबई एसटी सुरु करण्यात येणार आहे. नानवली येथून सकाळी ५ वाजता
मुंबईकड़े जाणार व मुंबईहून रात्री ९:३० वाजता मुंबईहून नानवली कडे येणार
आहे. सदर गाडी कायमस्वरूपी सुरु राहण्यासाठी दिघी विभागातील प्रवाशांनी या
गाडीत प्रवास करावा असे आवाहन एसटी प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांनी केले
आहे
Post a Comment