छाया :- सुशील यादव
“विखुरलेला समाज संघटीत झाला तर त्याचा फायदा त्या त्या समाजाला होतो” कोलाड येथे रायगड जिल्हा नाभिक समाज सभागृहाच्या भूमीपूजन समारंभात सुनील तटकरे यांचे प्रतिपादन
म्हसळा : सुशील यादव
“विखुरलेला समाज संघटीत झाला तर त्याचा फायदा त्या त्या समाजाला होतो” असे सूचक प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हा नाभिक समाज सभागृहाच्या, पाले बुद्रुक , कोलाड येथील भूमीपूजन व सत्कार समारंभात केले. सदर सभागृहाचे भूमिपूजन ( शनि .१८ नोव्हेंबर रोजी ) तटकरे यांच्या हस्ते पार पडले. हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे विशेष स्मरण करून तटकरे यांनी आपल्या मनोगतास सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्याची स्थापना नाही केली तर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हे विसरून चालणार नाही ज्या हिंदवी स्वराज्यात सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश होता आणि “होता जिवा , म्हणून वाचला शिवा” या वाक्प्रचारातील जिवा म्हणजेच जिवा महाला हा हि नाभिक समाजाच होता हे विसरता येणारच नाही असे तटकरे म्हणाले. रायगड जिल्हा नाभिक समाज सभागृहाला सुनील तटकरे यांनी रु. १५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल रायगड जिल्हा नाभिक समाजातर्फे तटकरे यांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी नाभिक समाजाचे रायगड जिल्ह्यात नव्याने निवडून आलेले नगरसेवक, सरपंच , उपसरपंच , सदस्य आशा एकूण ४२ जणांचा सत्कार तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सदर समाजगृहासाठी ४ गुंठे जमीन विना मोबदला देणारे अनंत पांडुरंग सकपाळ यांचा तटकरेंच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी रोहा प.स. सभापती वीणाताई चितळकर, रायगड जिल्हा नाभिक समाज सभागृह जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष दिलीप टके, उपसभापती विजया पाशिलकर, नाभिक समाज संघटनेचे संस्थापक दिनाभाई मोरे , सुनीता महाबळे, संभे सरपंच सौ. सु.कु. जाधव, नाभिक समाज जिल्हा अध्यक्ष संतोष गायकवाड, शशिकांत चव्हाण, यशवंत खराडे, सौ. देवकर, रोहा नगरसेवक समीर सकपाळ, मयूर दिवेकर, भाऊ पांडे, मारुती शिर्के, दिलीप शिर्के,प्रदीप कदम, विजय पवार या मान्यवरांसह जिल्ह्यातील नाभिक बांधव व भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
चौकट : भीमा सहकारी कारखान्याच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरले आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाज मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पेटून उठला. एवढ्या छोट्या समाजाचा रुद्रावतार पाहून मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस याना देखील नाभिक समाजाला पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली. गेल्या तीन वर्षात भाजप च्या मंत्री , नेत्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली परंतु कुठेही माफी मागितल्याचे मला आठवत नाही परंतु नाभिक समाजासारख्या संख्येनी छोट्या समाजाच्या बाबतीतील वक्तव्याबद्दल खुद्द मुख्यमंत्र्याना देखील दिलगिरी व्यक्त करायला लागणे हीच खरी तुमची ताकत आहे.सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
Post a Comment