हेल्प ग्रुप ने दिला मदतीचा हात....


प्रतिनिधी,
दुबळ्या आर्थिक परिस्थिती चा शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून हेल्प ग्रुप ही सामाजिक संस्था पुढे आलीय.
PNP हाईस्कूल वडवली येथील दोन गरजू विद्यार्थीच्या शिक्षणाचा खर्च हेल्प ग्रुप तर्फे करण्यात येईल असं हेल्प ग्रुप च्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. माध्यमिक विद्यालय ते महाविद्यालयीन  (८ वी ते १२ ) शिक्षणाचा खर्च हेल्प ग्रुप करणार आहे. 

कु.दिपाली काशिनाथ खोपकर   इयत्ता-8वी ( गांव :- कुड़की )
व कु.हर्ष संदीप शिलकर  इयत्ता-8वी ( गांव :- वडवली )
या दोघांच्या शिक्षणची जबाबदारी हेल्प ग्रुप ने घेतल्याचे हेल्प ग्रुप च्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा