अधिकाऱ्याना हाताशी धरून विकास कामांची यादी मिळवून , मीच काम केले असा आभास निर्माण करण्याचा सुनील तटकरेंचा डाव : प्रशांत ठाकूर


म्हसळा येथील पत्रकार परिषदेत प्रशांत ठाकूर यांचा सुनील तटकरेंवर “प्रहार”
म्हसळा : सुशील यादव
चार अधिकाऱ्याना हाताशी धरून , विकास कामांची यादी मिळवून ते काम मीच मंजूर करून आणले , मीच केले असा आभास निर्माण करण्याचा सुनील तटकरें चा डाव असल्याची घणाघाती टीका करून भाजप चे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हसळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे यांच्यावर जोरदार “प्रहार” केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचावर टीका करताना ते पुढे म्हणाले की तटकरे हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांकडे काही कामांची मागणी करतात आणि मुख्यमंत्री या कामाना मंजुरी देतात व पुढे हि कामे मीच मंजूर करून आणली असा जनतेसमोर कांगावा करतात हि तटकरेची खेळी फार काळ टिकणार नाही. काही रस्ते मी मंजूर करून आणले असे तटकरे सांगत आहेत हे रस्ते वास्तविक ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून’ मंजूर झालेले आहेत. 
     भाजप सरकारला राज्याच्या सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण झाली या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील तमाम जनतेला अपेक्षित असणारा विकास या सरकारने केला आहे असे ठाकूर म्हणाले. लाभार्थीना योग्य वेळी योग्य तो होणारा लाभ हे म्हणजे गेल्या तीन वर्षात भाजप ने विकासाचे शिखर गाठ्ल्यासारखेच आहे. तसेच या दरम्यान राज्यात अनेक रस्ते, लोकउपयोगी प्रकल्प उभारण्याचे काम या सरकारने केले आहे आणि यापुढेही सुरु राहील आणि यामुळेच मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य आहे. राज्यात एकूण ५ लाख ९७ हजार ३१९ कोटी रुपयांचे एकूण १०९७ प्रकल्प सरकारने हाती घेतले आहेत. अशी माहिती ठाकूर यांनी या पत्रकार परिषदेत दिली. पळस्पे ते इंदापूर या बाबत ठाकूर याना प्रश्न विचारला असता हे काम भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून प्रगती पथावर आहे परंतु मागील सरकारने या कामात केलेल्या चुका सुधारण्यास थोडा विलंब होत आहे एवढेच ! तसेच या मार्गासाठी भूसंपादनाच्या बाबतीत काही ठिकाणी अडचणी येत आहेत याचे मुख्य कारण सातबारावर नाव एकाचे व जमीनिवर कब्जा एकाचा, या कारणाने काही प्रकारणे न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच माणगाव ते दिघी या मार्गाचे रस्तारुंदिकरणाचे काम सुरु झाले आहे परंतु या संपूर्ण मार्गाची अवस्था खड्यांमुळे फार बिकट झाली आहे. या कारणानेच प्राधान्याने या मार्गावरील कोणत्या भागातील रस्त्याचे काम आधी पूर्ण करायचे ते पाहूनच हे काम पूर्णत्वास गेले पाहिजे असे माझे मत आहे व या संदर्भात मी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. असे ठाकूर म्हणाले. राजकीय प्रश्नाना उत्तर देताने ठाकूर म्हणाले रायगड मधील सर्वात स्वार्थी पक्ष कोणता असेल तर तो शेकाप आहे. कधी शिवसेनेबरोबर तर आता राष्ट्रवादी सोबत. राष्ट्रवादी असो की शेकाप याना फक्त सत्ता हवी , या सत्तेतून पैसा हवा , व पुन्हा या पैश्यातून सत्ता. हे रायगड मध्ये मोठे झाल्याचे जे चित्र उभे केले जात आहे ते मोठे झाले नसून ती एक प्रकारची सूज आहे व भाजप ला सूज नको अशी मिश्कील टीका त्यांनी राष्ट्रवादी , शेकाप वर केली. शिवसेने बद्दल मात्र त्यांनी सावध भूमिका घेतल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवीत होते.तसेच मंत्री होण्याची सुप्त इच्छा व्यक्त करण्यासही ते विसरले नाहीत. या पत्रकार परिषदेत आ. प्रशांत ठाकूर यांच्या समवेत भाजप जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, संजय कोनकर , राजेंद्र राउत , म्हसळा तालुका भाजप अध्यक्ष शैलेशकुमार पटेल उपस्थित होते.    


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा