म्हसळा : सुशील यादव
म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात दोन एस.टी. बस ची समोराआसमोर टक्कर होऊन अपघात झाला, या अपघातात सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई हून सकाळी ११.०० वा निघालेली मुंबई-बोर्ली-श्रीवर्धन( वाहन क्र. ३२९५) ही एस.टी. घोणसे घाटात निवाची वाडी फाट्या पुढे आली असता श्रीवर्धन हून दुपारी ३.०० वा निघालेली श्रीवर्धन – कल्याण – भिवंडी (वाहन क्र. ३२५६) हि एस.टी. त्याच रस्त्यावर डाव्या बाजूला बंद स्थितीत उभ्या असलेल्या टँकर च्या उजव्या बाजूने निघून पुढे आली असता या दोनही एस.टी. बस ची समोरासमोर टक्कर झाली. मुंबई – श्रीवर्धन बस ही उतारात असल्याने ब्रेक दाबून देखील नियंत्रणात न राहिल्याने या दोनही बस ची टक्कर झाली असे मुंबई –श्रीवर्धन एस.टी. बस चा चालक ए.डी. मोरे यांनी सांगितले. सदर अपघातात अनिस अयुब धनसे, रा. कार्ले, रघुनाथ गणपत बांद्रे, रा. दुर्गवाडी, पल्लवी परशुराम लाड, रा.म्हसळा, अनिल लक्ष्मण पयेर, रा. खरसई, अनिता अनिल पयेर, रा. खरसई, बबन दामू पाटील, रा. श्रीवर्धन, रमेश देवजी पवार , रा. तला, हे प्रवासी किरकोळ जखमी झाले. या सर्व जखमीना उपचाराकरिता म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर अपघाताची नोंद म्हसळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मी सकाळी जेव्हा माणगाव येथे दवाखान्यात उपचाराकरिता जात होतो तेव्हा या अपघाताला कारणीभूत असणारा टँकर उभा होता. हा टँकर जर रस्त्यात उभा नसता तर सदर अपघात झाला नसता.
रघुनाथ बांद्रे , प्रवासी , दुर्गवाडी, म्हसळा
छाया : सुशील यादव
Post a Comment