म्हसळा, प्रतिनिधी,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांचे विशेष प्रयतमाने महाराष्ट्र शासनाचे नगरोथान योजणे अंतर्गत म्हसळा नगर पंचायती मार्फत शहरात विविध विकास कामांसाठी १ कोटी १३ लक्ष रुपये आणि स्वछता व्यवस्थापन व रस्ते बांधकामाकरिता ४० लक्ष रुपये निधीची मंजुरी मिळाली आहे पैकी पहिल्या टप्प्यात ८५ लक्ष रुपये खर्चाचे १५ विकास कामांचे प्रभाग निहाय उदघाटन व भुमीपूजन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदितीताई तटकरे यांचे शुभहस्ते करण्यात आले.या वेळी त्यांचे समावेत पक्षाचे नेते अलिशेट कौचाली,तालुका अध्यक्ष नाझीम हसवारे,सभापती उज्वला सावंत,उपसभापती मधुकर गायकर, नगराध्यक्षा कविता बोरकर,उपनगराध्यक्ष नासिर दळवी,माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,गटनेते संजय कर्णिक,भाई बोरकर,शहर अध्यक्ष रियाज घराडे,उपाध्यक्ष चंद्रकांत कापरे,युवक अध्यक्ष नईम दळवी,बांधकामसभापती संतोष काते,महिला बाळ कल्याण व शिक्षण सभापती जयश्री कापरे,महिला अध्यक्षा रेश्मा काणसे,नगर सेवक संजय दिवेकर,नगरसेविका सेजल खताते, संजय खताते,नगरसेविका फलकनाझ हुर्जुक,समीर काळोखे आदी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर पंचायत निवडणुकी पुर्वी नगर वासीयांना आ.सुनिल तटकरे यांनी म्हसळा नगरीचा विकास हाच आमचा ध्यास या ब्रीदवाक्या नुसार आम्ही वचन पाळत असल्याचे राजिप अध्यक्षा आदिती तटकरे यांनी सांगताना म्हसळा शहरात टंचाईचे कालावधीत भेडसावणारी पाणी समस्या आता संपणार आहे. पाच वर्षे रखडलेली म्हसळा नळ पाणी पुरवठा योजना मंजुरीसाठी साहेबांनी खूप मेहनत घेतली आहे या योजनेचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याचे आदेश जिल्हा अध्यक्षा आदिती यांनी पंचायत समिती आढावा सभेत जिप.पाणी पुरवठा अभियंता गांगुर्डे यांना दिले गेल्या दोन वर्षात म्हसळा नगरपंचयतीकडे शहराचे विकासाकरिता सुमारे ८ कोटी रुपयांचा विकास निधीची उपलब्धता झाली आहे पैकी अनेक कामांची पुर्तता झाली आहे तर प्रशासकीय इमारतीसह काही कामांसाठी मंजुरी मिळाली असल्याचे नगराध्यक्षा कविता बोरकर यांनी माहिती दिली.
Post a Comment