जिल्हा परिषद अध्यक्षांसमोर नागरिकांनी मांडल्या व्यथा


प्रतिनिधी,
पाणी पुरवठा विभाग आढावा सभेला उपस्थित ग्रामस्थांमधून सांगण्यात आले की मेंदडी कोंड येथील भारत निर्माण योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना सुरू होऊन ७ वर्ष झाली तरीही अद्याप पर्यंत हस्तांतरित केलेली नाही. तसेच तोराडी बंडवाडी येथील २२ लक्ष रुपयांची योजना कार्यान्वित नाही. तर लेप येथील नळपाणी पुरवठा योजनेचे साडे अकरा लाख रुपये पाण्यात जाण्याच्या मार्गावर असल्याचे उघड झाले आहे. ग्रामपंचायत खारगाव बुद्रुक मधील सुरई गावासाठी दोन वेगवेगळ्या नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत असे असतानाही येथील काही राजकीय वादामुळे व पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्षामुळे तेथील एका विशिष्ट समाजाच्या लोकांना पाणी मिळत नसल्याचे सुरई येथील ग्रामस्थांनी उघडपणे सांगितले आहे. मागील वर्षी पावसाळ्यात विठ्ठलवाडी, रुद्रवट, नेवरूळ या गावातील विहिरी पडल्या आहेत. त्यापैकी नेवरूळ गावातील विहिरीचे बांधकाम ग्रामस्थांनी केले आहे परंतु संबंधित ठेकेदारांनी या गोष्टीकडे लक्ष दिलेले नाही असे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले. विठ्ठलवाडी गावातील विहिरी संदर्भात पस सदस्य संदिप चाचले यांनी प्रश्न उपस्थित करून सांगितले की येथील विहीर पडून वर्षे झाला तरीही संबंधित विभाग व ठेकेदार यांच्या कडून अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. रुद्रवट येथील विहीर पडून देखील वर्षे होऊन गेला तरीही संबंधित ठेकेदाराने कोणतीच दखल घेतलेली नाही व या विहिरीचे काम अपूर्ण आहे। अशी माहिती समोर आली. काही गावातील योजनांवर १० लक्ष, २२ लक्ष, ४० लक्ष असे निधी खर्च  करूनही योजनांची कामे अपूर्ण असल्याने त्या गावातून पाणी पुरवठा सुरळीत होत नाही व अपु-या पाणी पुरवठामुळे नागरिकांमधे वाद निर्माण होत आहेत. तर एकीकडे मात्र अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने एकाच ठेकेदाराने दोन-चार कामांचे ठेके घेऊन निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाचे लाखो करोडो रुपयांच्या योजनांना चुना लावण्याचे काम केले. या सर्व योजनांची जि.प.मधून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा