म्हसळा : महेश पवार
म्हसळा तालुक्यातील डोंगराळ भागातील नेवरूळ ते सांगवड रस्ता म्हणजे जणू नौकेमधून प्रवास करण्याचा भास भासवणारा रस्ता अखेर चकाचक होणार असल्याचे वृत्त भाजपा उपअध्याक्ष व कोकण भवन शा.अ. यांनी सांगितले आहे. ह्या विषयी सवित्तर वृत असे की प्रमुख जिल्हा मार्ग कीं मी या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती दिवसेन दिवस रस्त्यावरती भलेमोठे खड्डे पडले होते ते काही दिवसापूर्वी त्या भागातील ग्रामस्थानी श्रमदानातून खड्डे भरण्याचे काम केले होते कारण त्या रस्त्याने सांगवड, ठाकरोळी , न्यु अनंत वाडी , कोकबल, रूद्रवट,घुम,नेवरूळ अशा एकूण सात गावातील नागरिक व शिक्षण घेण्यासाठी जाणारे शेकडो चिमुकले विदयार्थि हे सर्वच प्रवास करत असतात . तो रस्ता नादुरूस्त असल्यामुळे त्या रस्त्याला खाजगी वाहणे भरम साठ रक्कम घेतल्याशिवाय जात नाही ह्या सर्व प्रकरणाला त्या मार्गावरील सर्वच जनता वैतागली होती कारण जो -तो राजकीय पक्ष येतो अनेक वचने देऊन जातो त्या मुले तेथील ग्रामस्थांचा कोणत्याच पक्षावर विश्वास ठेवण्यास मागत नाही परंतू भाजप सरकारने ह्या सर्व प्रकारचे हाल पाहून कृष्णा कोबनाक यांनी प्रामाणिक पणे प्रत्यन्न करून पंधरा किलो मिटरच्या रस्त्यातील पहिल्या दुरुस्ती कार्यक्रमा अंतर्गत चार किलो मिटरच्या रस्त्याला नव्वद लाख रुपयांची निधी मंजूर झाली असून काहि दिवसातच त्या रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले आहे राहिलेला रस्ता हा भाजप सरकार करणार असल्याचे सांगितले परंतू त्या भागातील नागरिकांनी इतर पक्षांच्या खोट्या आश्वासनाला बली न पडता ज्यांची सत्ता आहे तेच कामे करणार आहेत .ते बोलताना पुढे म्हणाले की त्या भागातील लोकांनी एकत्र येऊन विविध भेडसावनारे प्रश्न सरकारकडे मांडा आपण मांडलेले प्रश्न नक्कीच भाजप पूर्ण करेल हे आम्ही ठामपणे सांगत आहोत.
Post a Comment