बोर्लीपंचतन : प्रतिनिधी,
बोर्लीपंचतन ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम पाहताना चौदाव्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार ‘आमचे गाव आमचा विकास' या उपक्रमांतर्गत चार वर्षे अपंग, मागासवर्गीय व गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जात असताना लाभार्ती मागणीनुसार निधी अपुरा पडल्याने गरजू विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची वेळ येऊन गेली आहे, अशी खंत सरपंच गणेश पाटील यांनी व्यक्त केली. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन ग्रुपग्रामपंचायतीने 'आमचा गाव आमचा विकास कार्यक्रमांतर्गत चौदा वित्त आयोगामार्फत प्राथमिक, माध्यमिक शाळा, अंगणवाडी मुलांना तसेच मागासवर्गीय गरजू विद्यार्थ्यांना संगणक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन २२ नोव्हेंबर रोजी केले होते. त्यावेळी ते बोलत होते. गावातील अंगणवाड्यांना गॅस सिलेंडर व शेगडी वाटप करण्यात आले असून ग्रामपंचायतीमार्फत १५ टक्के निधीमधून मागासवर्गीय समाजासाठी अनुदान व ३ टक्के अपंग कल्याण निधीतून अपंगासाठी साहित्य व धनादेश वाटप करण्यात आले.

Post a Comment