म्हसळा, प्रतिनिधी
म्हसळा तालुका
विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटातून जैमिन जैन तर प्राथमिक गटातून आयुष
करडे यांच्या प्रतिकृतींनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. तर
शिक्षकांमधून सत्यवान मांजरे यांना प्रथम क्रमांक मिळाला. बक्षीस वितरण
समारंभ जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे यांच्या अध्यक्षतेखाली आयडियल हायस्कूल
येथे संपन्न झाला. याप्रसंगी सभापती उज्ज्वला सावंत, वसंतराव नाईक कला,
विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.एन. राघवराव,
पंचायत समिती सदस्या छाया म्हात्रे, नाझीम हासवारे, माजी सभापती अनिता खडस,
अंकुश खडस, म.शरीफ हसवारे, इकबाल कादिरी, मेहमूद अली वकील, सतिश शिगवण,
माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष नितीन पाटील, सर्व केंद्रप्रमुख, साधन
व्यक्ती, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.
विज्ञान
प्रदर्शनात माध्यमिक गटात ५५ तर प्राथमिक गटात ७२ प्रतिकृती मांडल्या
गेल्या. गेल्या काही वर्षातील हा उच्चांक आहे. त्याचबरोबर दोन्ही गटाच्या
वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्न मंजूषा स्पर्धा विशेष म्हणजे
शिक्षकांसाठीही अशाच प्रकारच्या आयोजित करण्यात आल्या. या प्रदर्शनात
माध्यमिक विभागातुन आइडियल इंग्लिश स्कूल चा जैमिन रमेश जैन याचा तर
प्राथमिक विभागातून आइडियल चाच आयुष
योगेश करडे यांच्या प्रतिकृती (मॉडेल) प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
शिक्षकांतुन सत्यवान मांजरे यांना प्रथम तर जयसिंग बेटकर यांच्या
प्रतिकृतीस दूसरा क्रमांक त्याचप्रमाणे परशुराम चव्हाण यांना तीसरा क्रमांक
मिळाला. शिक्षक वकृत्व स्पर्धेत मांदाटने शाळेतील शिक्षक नरेश सावंत यांचा
प्रथम क्रमांक आला. लोकसंख्या शिक्षण या विषयावरील मॉडेलमध्ये अंजुमन
हाइस्कूलचे प्रयोगशाला परिचारक संजय गोरेगावकर
यांना प्रथम क्रमांक मिळाला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना वसंतराव नाईक
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.एन.राघवराव यांनी विज्ञान आणि
डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची एकमेकांशी असलेले दृढ़ संबंध याबद्दल सविस्तर
मार्गदर्शन करताना डॉ.अब्दुल कलाम हे अनन्यसाधारण व्यक्तिमत्व असून यांचा
प्रामाणीकपणा, मानवता तसेच साधी रहाणी आणि विज्ञानाबाबत त्यांची धेयवेढेपण
इत्यादि त्यांच्या आदर्श गुणांबाबत प्रकाश टाकला. विद्यार्थयानिही हा आदर्श
समोर ठेवण्याचे आवाहन केले. अध्यक्षय मार्गदर्शनात जि.प.सदस्य बबन मनवे
यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांचे कौतुक करून शुभेछा देताना इतरांनी नाराज न
होण्याचे आवाहन केले. स्पर्धेमध्ये सर्वच यशस्वी होत नाहीत त्यामुळे
पुढीलस्पर्धेत मी याहिपेक्षा उत्तम कामगिरी करून बक्षीस मिळविण्याचा
निच्छित पणे प्रयत्न करेन अशी महत्वाकांशा बाळगण्याचे आवाहन केले.
गटशिक्षणाधिकारी गजानन साळुखे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश कोठावले
यांनी सूत्रसंचालन केले तर प्राचार्य मेहमूद वकील यांनी आभार मानले.
Post a Comment