म्हसळा : महेश पवार,
म्हसळ्यातील धान्य साठवणुकीच्या गोदामात प्रचंड मोठ्या प्रमाणावर घुशी, उंदरांचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे येथे साठवणुक करण्यात येणाच्या धान्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या गोदामांची अवस्थाही बिकट झाली असून ती कधीही कोसळण्याची भिती व्यक्त होत आहे. येथील धान्य गोदाम ईमारत अत्यंत जुनी असल्यामुळे ती पुर्णताः जीर्ण झाली आहे. त्यामुळे तीचा डोलारा कधीही कोसळण्याची भिती व्यक्त होत आहे. या गोडावूनची क्षमता ५०० मेट्रीक टन इतकी आहे, परंतु त्या इमारतीच्या भिंतीला तडले गेल्याने इमारतीचा डागडुजीचा प्रश्नही चव्हाट्यावर आला आहे. या इमारतीचे पत्र्याचे छतालाही अनेक मोठे छिद्र पडल्याने पावसाचे पाणी थेट येथील गोदामात येत असते. इमारतीचा भागाला ब-याच ठिकाणी छिद्रे असल्याने त्याम धुन मोठ्या प्रमाणात उंदीर व घुसी येऊन धान्याची नासाडी करत आहेत.
त्यात इमारतीचा मुळ पाया हा देखील जीर्ण झाला असल्याने ती कोसळण्याची भिती व्यक्त होत आहे. गोदाम मध्ये विद्युत लाईटची अवस्थाही बिकट आहे आंधळा दळतोय आणि कुत्रा पिठ खातोय असा प्रकार पुरवठा विभागात दिसत असल्याची चित्र याठिकाणी पाहवयास मिळत आहे.
आमच्या गोदामाची असलेली परिस्थिती मी वेळोवेळी सुधारत आहे. मला जेवढे शक्य होईल तेवढे लक्ष देऊन दुरुस्ती करत आहे. गोदामामध्ये २००७ चा राहिलेला माल निर्गम करण्यासाठी आमच्या कार्यालयाकडून पुढील प्रोसेस सुरू आहे आदेश प्राप्त होताच ते धान्य निर्गम केले जाईल- रामदास झळकेम्हसळा तहसिलदार
Post a Comment