दांडगूरी परिसर आऊट ऑफ रेंज, परिसरात टॉवर बसविण्याची माणगी...

श्रीवर्धन-दांडगुरी,
श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी पंचक्रोशीतील असलेल्या गावांतून मोबाईल टॉवर नसल्यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. श्रीवर्धन तालुक्यात मोबाईलला सर्व ठिकाणी नेटवर्क आहे परंतु श्रीवर्धन-बोलपंचतन रोडलगते असलेल्या दांडगुरीत मात्र मोबाईल फोनला नेटवर्क नसल्याने नागरिकांना फोन करण्यासाठी पाच ते सहा किलोमीटर जावे लागत आहे. दांडगुरी पंचक्रोशीत बारा ते तेरा गावांचा समावेश आहे. येथे सर्व सुखसुविधा आहेत, परंतु नेटवर्क नाहीं. दांडगुरी हे गाव थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे इथे सरकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात भाड्याने राहतात. या रोडवरून मुरुड जंजिरा, दिवेआगर, हरिहरेश्वर या ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी या रस्त्यावर सातत्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. मात्र मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे इथे पर्यटक थांबायला मागत नाही. तर इथे भाडे अतिशय कमी असल्यामुळे इथे अनेकजण राहण्याचा पसंद करतात. सध्या येथे पाच किलोमीटरवर जावून फोन कराव लागतो. मोबाईल धारकांची वाढती संख्या लक्षात घेता इथे मोबाईल टॉवर कंपन्यांनी इथे मोबाईल टॉवर बसवण्याची मागणी होत आहे. सोशल मीडिया नेटवर्कचे तरूणाईला एकप्रकारे वेड लागले आहे. मित्रांबरोबर चॅटिंग करणे किंवा व्हॉट्सअप त्याचबरोबर फेसबुक हा सोशल मीडियाचा वापर तरूणाई वापर करीत असताना या पंचक्रोशीत सुमारे दोन हजार मोबाईलधारक असून खाजगी मोबाईल टॉवर कंपनीने तरी इथे मोबाईल टॉवर बसवावे, अशी  पंचक्रोशीतून मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा