महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत सन 2017-18साठी जिल्ह्यात अलिबाग, पेण, माणगाव, खालापूर या चार तालुक्यामध्ये 10 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत. त्याअंतर्गत पी.पी.पी. भात पीक प्रात्यक्षिकांतर्गत सोमजाई शेतकरी उत्पादक कंपनी इंदापूर ता.माणगाव येथे नुकतेच (दि.26 रोजी) शेती दिन व पिक कापणी प्रयोगाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास 'आत्मा' चे प्रकल्प उपसंचालक डी.एस.चव्हाण, स्वदेश फाउंउडेशन माणगावचे महाव्यवस्थापक तुषार इनामदार, कृषि सहाय्यक एम.एस.पावसे, ग्राम समाज परिवर्तन समन्वयक लहूराज धोलवडे, आदी अधिकारी,कर्मचारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी प्रकल्प उपसंचालक आत्मा चव्हाण यांनी भात पिक प्रात्यक्षिक किटमध्ये वापरण्यात आलेल्या विविध निविष्ठामुळे भात पिकामध्ये उत्पादनामध्ये वाढ झाली तसेच किड व रोग यांचा प्रार्दुभाव कमी झाला असल्याचे सांगितले तसेच पीक कापणी प्रयोगाबाबत माहिती दिली. तसेच किमान आधारभूत किंमत सन 2017-18 साठी धान सर्वसाधारण दर्जा रु.1550 क्विं. व “+” रु.1590/- क्विं.आहे व वखार महामंडळाच्या धान्य तारण योजनेबाबत मागदर्शन केले.
तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन नाडकर रा.निव्ही ता.माणगाव जि.रायगड यांच्या शेतावर भात पिक प्रात्यक्षिकाचे पीक कापणी प्रयोग करण्यात आले. यावेळी कर्जत-5 वाणाचे धान्य उत्पादन 39,200 किलो व पेंढा उत्पादन 120 किलो अंदाजे एवढे आले.सदर कार्यक्रमास सोमजाई शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक व सभासद उपरोक्त अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी श्री.एम.एस.पावसे कृषि सहाय्यक यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
Post a Comment