जिल्ह्यातील आंबा व भाजीपाला निर्यात करुन इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत मँगोनेट व व्हेजनेट हि संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीवर जिल्ह्यातील इच्छुक निर्यातदार शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यात 2017-18 साठी युरोपियन व इतर देशात आंबा व भाजीपाला निर्यात करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना बागांची 'मँगोनेट' व 'व्हेजनेट' प्रणालीद्वारे नोंदणी करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करणेची अंतिम मुदत 31 जानेवारी 2018 आहे तर अमेरिकेला निर्यात करण्यासाठी नोंदणीचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2017 असा आहे. तसेच निर्यातक्षम भाजीपाला निर्यात नोंदणी करण्यासाठी 'व्हेजनेट' या प्रणालीवर शेतकरी नोंदणी करु शकतात. नोंदणी भाजीपाला लागवडीनंतर पंधरा दिवसांनी परंतु काढणीच्या एक महिनाआधी करणे बंधनकारक आहे. 'मँगोनेट' तसेच 'व्हेजनेट' अंतर्गत नोंदणी करण्यासाठी 7/12,8अ व शेताचा स्थळदर्शक नकाशा जोडणे आवश्यक आहे. तरी आंबा व भाजीपाला निर्यात करण्यास इच्छुक असणाऱ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक, कृषि अधिकारी, रायगड -अलिबाग यांनी केले आहे.
Post a Comment