श्रीवर्धन, टीम म्हसळा लाईव्ह
श्रीवर्धन तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तेरा शाळांमध्ये तांदूळ साठी उपलब्ध नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सरकारकडून दिला जाणारा मोफत पोषण आहार बंद झाला असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत उघड झाली आहे. नरेश पाटील यांनी जिल्हा दौच्यादरम्यान श्रीवर्धन तालुक्याला भेट देऊन शिक्षण व आरोग्य खात्यासंदर्भात अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक श्रीवर्धन पंचायत समिती कार्यालयात आयोजित केली होती.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या प्रगती अदावडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्यामकांत भोकरे, माजी सभापती सुकुमार तोंडलेकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रतोष कोलथरकर, गटविकास अधिकारी गमरे, शिक्षण व आरोग्य खात्याशी निगडित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या सभेमध्ये शिक्षण व आरोग्यविषयक अनेक समस्यांची उकल करण्यात आली. यावेळी कमी पटसंख्यांमुळे तीन शाळा बंद झाल्या असून एक ते पाच पटसंख्या असलेल्या ९ शाळा आहेत. तर शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे तेरा शाळा अप्रगत असल्याची माहिती गट शिक्षण अधिकारी यांनी दिली. यावेळी बोलताना शिक्षण सभापती यांनी शिक्षक भरती करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेस नाहीत. याबाबत संपूर्ण जिल्ह्यात आढावा घेऊन शासनाकडे मागणी करणार असून स्वतःच्या कर्जत मतदारसंघातसुद्धा एक शाळा शून्य शिक्षक आहे असल्याची माहिती पाटील यांनी दिली. तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीबाबत अनास्था असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. यावेळी पाटील यांनी शाळांच्या इमारातींबाबत कोणतेही राजकीय वळण न लावता जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, उपाध्यक्ष आस्वाद पाटील व मी निश्चित प्रयत्न करेन, असे आश्वासन दिले.
तालुक्यातील तेरा शाळांमध्ये तांदूळ साठा उपलब्ध नसल्यामुळे पोषण आहार बंद असल्याच्या विषयावरून चांगलीच चर्चा रंगली, पोषण आहारासंदर्भात जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी पवार हे बेजबाबदारपणे वर्तन करत आहेत. जिल्ह्यात अन्य ठिकाणीदेखील ही समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. त्यासाठीच हा दौरा करत असून जिल्हा परिषद कार्यालयातील पोषण आहार संबंधीत बेजबाबदार अधिकान्यांची शासनाकडे तक्रार करणार असून पोषण आहार वेळेत पोहचण्याची दक्षता घेणार असल्याचे सभापती पाटील बोलत होते.
Post a Comment